हटके

सासुवर जडला जीव पत्नीला म्हणतो माझ्या सोबत नको राहू 

Spread the love
भागलपूर (बिहार ) / नवप्रहार डेस्क 
         काही वेळा असे काही प्रकरण कानावर येतात की त्यावर विश्वास करावा अथवा नाही हा प्रश्न स्वतःलाच पडतो. बिहार च्या भागलपूर येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका जावयाचा जीव त्याच्या सासुवर आला आहे. तो म्हणतो त्याची आता पत्नी सोबत राहायची इच्छा नाही. पण त्याच वेळी त्याला सासू सोबत लग्न करून संसार थाटायचा आहे.

बांका जिल्ह्यातील रहिवासी असलेली दोन मुलांच्या आईनं न्याय मिळवण्यासाठी आपल्या आईसह डीआयजी कार्यालय भागलपूर गाठलं. ती सांगते की, माझं लग्न 10 वर्षांपूर्वी बांका जिल्ह्यातील बोस्सी पोलीस स्टेशन हद्दीतील मसूदन बाबा मंदिरात झालं होतं. देवाच्या कृपेने मला दोन मुलीही आहेत. एक मुलगी 9 वर्षांची आणि दुसरी 6 वर्षांची आहे. तिने सांगितलं की, माझे पती मुंबईत पोकलेन चालवतात. आता माझ्या नवऱ्याला मी आवडत नाही, तो मला नेहमी मारतो आणि मुलांनाही मारतो. मोठ्या मुलीलाही विजेचा धक्का देऊन मारहाण करण्यात आली. तो नेहमी पैशाची मागणी करतो. पीडित महिलेच्या आईचं म्हणणं आहे की, माझा जावई मद्यपी आहे. तो म्हणतो मला तुझी मुलगी नको आहे. मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन.
ती पुढे म्हणाली, की जावयाच्या हातात जे काही सामान येईल, त्याने तो माझ्या मुलीला मारहाण करू लागतो.. बौसी पोलीस ठाण्यात हताश झालेल्या आई, मुलगी आणि दोन लेकरं डीआयजींकडून न्याय मिळवण्यासाठी भागलपूरला पोहोचले आहेत. आता या पीडित महिलेला काय न्याय मिळतो हे पाहावं लागेल. मात्र, रोजच्या मारहाणीला कंटाळून या महिलेलाही पतीसोबत राहायचं नाही.
What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close