दारूबंदीसाठी मुरमाडी ग्रामपंचायत चा पुढाकार ▪️दारू हस्तगत करून केली पोलिसांच्या स्वाधीन

भंडारा /लाखांदूर : तालुक्यातील दिघोरी /मो. पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पारडी व मुरमाडी येथे अवैध दारूविक्रीला ऊत आले होते . यामुळे गावातील शांतता धोक्यात येऊन घरोघरी कलह निर्माण होणे सुरू झाले . यामुळे दारूविक्रीवर आळा घालण्याची मागणी महिलांकडून ग्रामपंचायतला केली जात होती . पण पोलिसाकडून थातूरमातूर चौकशी करून पोलिस वेळ मारून नेत होते . त्यामुळे पारडी व मुरमाडी दारूचा महापूर सुरू होता . याला संतापून ग्रामपंचायत ने अवैध देशी दारू विक्रेती बंद करण्याचा पुढाकार घेतला आहे . आज दिनांक ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजे गावा लगतच्या पारडी शेतात एक देशी दारूविक्रेत्यांजवळील दारू पकडून दिघोरी/मो. पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली .
या प्रकारामुळे पारडी व मुरमाडीत सुरू असलेली अवैध दारूविक्री चव्हाट्यावर आली आहे . लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी व मुरमाडी येथे मागील एक – दोन वर्षापासून अवैध देशी दारूविक्रीला ऊत आले होते . यामुळे गावातील ज्येष्ठापासून तरूण शालेय दारूच्या आहारी गेले देशी दारूविक्रीला आळा नसल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांवरही पडत होता . यामुळे गावातील शांतता धोक्यात येवून घरोघरी भांडणे व वाद – विवादाचे प्रमाणात वाढ झाली होती . या संदर्भात वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून पोलिस प्रशासनाला देशी दारूविकेत्यांच्या मुसक्या आवळण्याची विनंती करण्यात आली . परंतु , थातूरमातूर चौकशी होत असल्याने आज पर्यंत दारूविक्री थांबली नाही. यामुळे ग्रामपंचायत पद अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता . त्यातच प्रशासन लक्ष देत नसल्याने आज दिनांक ४ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत सर्व पदाधिकाऱ्यांना . सकाळी ७ वाजताच्या सुमारात गावालगतच्या पारडी शेत शिवारात देशी दारूविक्री करीत असल्याचे निदर्शनास येताच एका दारूविक्रेत्यांना रंगेहात पकडले व दारूविक्री बंद पाडली . दरम्यान दिघोरी/मो. पोलिसांना पाचारण करून पकडलेली देशी दारू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली . या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . गावात कायमस्वरूपी दारूबंदी व्हावी , अशी मागणी ग्रामपंचायत व महिलांकडून लावून धरली . त्यामुळे पोलिस व ग्राम पंचायत प्रशासन कोणती भुमिका घेते ? याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे .
▪️एका दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल येथे सुरू असलेली अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत मैदानात उतरल्या . अवैध दारूविक्रेत्यावर हल्लबोल करीत विक्री करीत असलेली दारू पकडली . या घटनेसंदर्भात दिघोरी/मो. पोलिसांना माहिती देवून पाचारण करण्यात आले . दरम्यान दिघोरी/मो. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करीत दारू जप्त केली आहे . प्रकाश मारोती कोवेडवार (३७) हा पारडीचा असून दहेगाव येथे वास्तव्य करीत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .