क्राइम

बलात्काराचा प्रयत्न फसल्यानंतर कीकनाशक पाजण्यात आलेल्या मुर्लचा मृत्यू 

Spread the love

इंदापूर  / नवप्रहार डेस्क 

           एकीकडे शासना कडून ‘ बेटी बचाव, बेटी पढाव  ‘ योजना राबविल्या जात आहे. तर दुसरीकडे मुली, तरूणी आणि महिला सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळत आहे. मुलींना शिक्षित करण्यासाठी ह्या शाळेत त्यांना पाठवण्यात येते काही ठिकाणी  त्याच शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याच्या घटना उजेडात येत आहे. इंदापूर मधून देखील अशीच घटना समोर आली आहे. क्लार्क असलेल्या व्यक्तीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो अपयशी राहिल्यावर त्याने मुलीला कीटकनाशक पाजले होते. या मुलीवर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

रविवारी घडलेल्या या घटनेनंतर आज तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उरणमधली घटना ताजी असतानाच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न शाळेतील कारकूनाने केला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, इयत्ता नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नजर ठेवत थेट तिच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका शाळेतील कारकूनाने केला होता. संबंधित मुलीने या कारकूनास प्रतिकार केल्याने आरोपीने तिला कीटकनाशक औषध पाजून बळजबरी केली होती. रविवारी दि.28 जुलै पुण्याच्या इंदापूर तालुक्यात घडला होता.

दरम्यान अकलूज मधील खाजगी रुग्णालयात या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान आज या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. उरणची घटना ताजी असताना आता इंदापूर तालुक्यातील या घटनेने खळबळ उडालीय. रणजित जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नांव असून पोलिसांनी आरोपी विरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या आरोपी विरोधात पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. पिडीत मुलीच्या फिर्यादीनुसार, आरोपी रणजित जाधव याने आपल्या घरी येऊन अंगलगट करण्याचा प्रयत्न केला. बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला पीडितेने प्रतिकार केला आणि याच वेळी रणजीत जाधव याने कीटकनाशक पाजलं अशी फिर्याददेखील पोलिसांनी दाखल केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close