नागपूर बायपास येथे दगडाने ठेचून कामगाराची हत्या

अरविंद वानखडे / यवतमाळ
यवतमाळ येथे मध्येप्रदेशातून काम करण्याकरिता २० मजुरांचा समूह गेल्या तीन महिन्यापासून चेंबर व कॉर्नरच्या फुलाचे काम नागपूर बायपासला करीत आहे. हा मजूर मध्येप्रदेश येथील एकाच भागातील रहिवासी असून नागपूर बायपास वरील विनीशियल पार्क येथे सर्व राहत होते. मृतक रामपालसिंह टेकाम वय ४५ रा.लमसरी मध्येप्रदेश तर दिनेश यादव वय ३२ रा. गायटिका धवाई मध्येप्रदेश असे आरोपीचे नाव आहे.
मोबाईल हरवलाच्या
शुल्लक कारणावरून दिनेश यादव यांनी रामपालसिंह टेकाम याला किराणा सामान आणण्याच्या बहाण्याने नेऊन जाजु इंटरनॅशनल स्कूल च्या समोरील निवांत ढाब्याजवळ बायपास रोड येथे दिनांक २६ डिसेंबर रोजी रात्री वेळ च्या सुमारात शस्त्राने व दगडाने ठेचून आरोपीने खून केला.
सविस्तर वृत्त असे की मध्य प्रदेशातून ठेकेदार फुलमाळी यांनी पुलाच्या डागडूगी करिता काही मजूर बोलवण्यात आले होते. जवळपास हे मजूर तीन महिन्यापासून येथे काम करत आहे. त्यातील आरोपी दिनेश यादव यांचा मोबाईल सायकाळी हरवला त्यामुळे त्याने सर्व मजुरांना शिवीगाळ केली मात्र रामपालसिंह टेकाम यांनी सर्वांना शिवीगाळ का करतो असे बोलून या दोघांमध्ये वाद झाला या वादाला येथील सर्व मृत्काच्या पुतण्या व मजुरांनी समझोता करून आपसात मिटवण्यात आला. वाद निपटला असे वाटले असतांना मृतक रामपालसिंग यांना आरोपी दिनेश यादव यांनी किराणा सामान आण्या करिता डोली गावी नेले. दोघेही सोबत डोरली या गावातील किराणा दुकानांमध्ये उमेशसिंह परस्ते, भूकंनसिंह मराबी, सुलतानसिंह टेकाम यांनी पाहिले हे सुद्धा किराणा सामान आणण्याकरिता गेले असता मृतक व आरोपी हे दोघे एकत्र आढळले मात्र सर्वजण परत आले असता मृतक रामपालसिंह टेकाम हे परत आले नसल्याने दिनेशला चौकशी केली असता तो माझ्यासोबत नसल्याची उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यामुळे आम्हा सर्वांमध्ये संशयाची भूमिका निर्माण झाली आणि रामपालसिंह यांच्या शोध घेण्याकरिता विनिशियल पार्क डोरली मार्गे सर्वांनी शोध घेतला त्यांचा मोबाईल सुद्धा बंद येत असल्याने सर्वांची तारांबळ उडाली शोध घेत असता जाजू इंटरनॅशनल स्कूल व निवांत धाब्याच्या मधातल्या भागामध्ये झाडाझुडपामध्ये रामपालसिंह टेकाम हा रक्ताने लतपथ होऊन त्याला अत्यंत जखमा डोळ्यावरती व कान हनोटी व इत्यादी भागांमध्ये रक्ताचा प्रवाह सुरू होता. गंभीर दुखापतीने त्याचा तिथे मृत्यू झाल्याची माहिती मृतकाच्या पुतण्याने दिली. सायंकाळी दिनेश यादव यांच्याशी झालेल्या वाद विवादामुळे बदला घेत ही घटना घडवून आणण्याचा आरोप त्याच्या पुतण्या घनश्यामसिंह यांनी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे तसेच पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.