रखवालदाराची दगडाने ठेचून हत्या
शहरात खळबळ ; पती – पत्नीवर संशय
अचलपुर प्रतिनिधी –किशोर बद्रटिये :-
अचलपूर तालुक्यातील देवगाव येथे शेतात रखवालदार असलेल्या इस्माची हत्याबकरण्यात आली आहे . राजु नारायण येवणे (५२) असे हत्या करण्यात आलेल्या इस्माचे नाव आहे. यापूर्वी याठिकाणी रखवालदार असलेल्या पती पत्नीने रजुण्याचा खून केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
.पोलीस स्टेशन परतवाडा हद्दीतील देवगाव गावात मृतक नामे राजू नारायण येवने वय 52 वर्ष हा शेतमालक कुंजबिहरी गजानन येवले याच्या शेतात सोकारी होता. त्यास त्याच शेतात काही दिवसापूर्वी सोकारी म्हणून असलेल्या दिलीप आणि त्याची बायको दोन्ही रा. केसरपुर,ता.चिखलदरा यांनी काही तरी अज्ञात कारणामुळे डोक्यात दगड घालून खून केला. मृतकाचा अतिरक्तस्रावाने जागीच मृत्यू झाला . पती पत्नी ने घटना स्थळावरून घटना होताच फरार झाले .त्यांचा शोध परतवाडा पोलीस
करत असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेवरून गावात चर्चा असुन आर्दश ग्राम म्हणुन असलेला गावात ग्रामपंचायत मतदाना पुर्वी घडलेल्या घटनेने गालबोट लागले आहे .