दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या आईनेच केली 8 वर्षाच्या मुलाची हत्या

प्रेमात माणस आंधळी होतात असे म्हटल्या जाते. ती बाब राजस्थान च्या भरतपूर जिल्ह्यातील चंदनपुरा गावात घडली आहे. येथे एका महिलेचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध होते आणि तिच्या 8 वर्षच्या मुकणे त्यांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. तो या घटनेची वाच्यता करेल आणि आपले प्रेमसंबंध उघड होतील म्हणून त्या दोघांनी मिळून मुलाची हत्या केली. दीड वर्षानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
भरतपूर (राजस्थान):
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 8 वर्षांच्या मुलाच्या हत्येची घटना चंदनपुरा गावात घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी कृष्णकांत उर्फ कृष्णा आणि त्याची प्रेयसी हेमलता हिला अटक केली आहे. नात्याने दोघेही वहिणी आणि दीर आहेत. दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले होते. या महिलेच्या मुलाने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले होते. आपला मुलगा बाहेर कुठे तरी सांगेल. आपलं कृत्य हे कुटुंबातील लोक आणि समाजात समोर येईल अशी भीती दोघांना होती. त्यामुळे दोघांनी मिळून 8 वर्षांच्या मुलाला संपवण्याचा कट रचला. बाहेर फिरवण्यासाठी घेऊ जाण्याच्या बहाण्याने मुलाचा शेतात नेऊन खून केला. चिमुकल्याचा खून केल्यानंतर मृतदेह शेतात गाडून दोघे घरी आले होते.
मृत मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तब्बल दीड वर्ष हा तपास सुरू होता. पण पोलिसांकडून कोणताच तपास होत नसल्यामुळे वडिलांनी तपास करणारे पोलीस अधिकारी बदलावे अशी मागणी केली होती. त्यानंतर नव्याने आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि प्रकरणाचे धागेदोरे हे घरापर्यंत पोहोचले. पोलिसांनी जेव्हा आरोपी महिला आणि दिराची उलटतपासणी केली तेव्हा दोघांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.