विशेष

मुंबईत निर्भया कांडाची पुनरावृतत्ती टळली 

Spread the love

पोलिसांनी दाखविले नसते प्रसंगावधान तर …..

मुंबई / नवप्रहार मीडिया 

          रिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेचे ओहरं करून तिच्यावर बलात्कार करण्याच्या पेआयत्नात असलेल्या रिक्षा चालकास अटक करण्यात आली आहे. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या प्रसागवधाणामुळे ती महिला अनर्थ होण्यापासून वाचली. घटना डोंबिवली येथील असून या कामात रिक्षा चालकास मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

मानपाडा पोलिस स्टेशन मधील ऑफिसर ने दिलेल्या माहितीनुसार, ‘दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबई मध्ये टाळण्याचं काम पोलिसांनी केलं आहे.’ ही घटना शुक्रवारी रात्री 10.45 ची आहे. महिला खिड कलेश्वर मंदिराला भेट देऊन घरी परतत होती. रिक्षामध्ये प्रवासी होते पण अशा परिस्थितीतही ती रिक्षामध्ये चढली. खिडकली बस स्टॉप ते कोल्हेगाव नाका दरम्यान ती प्रवास करत होती.

‘कोल्हेगावला जेव्हा ती उतरत होती तेव्हा 22 वर्षीय रिक्षाचालक प्रभाकर पाटील आणि रिक्षातील त्याचे मित्र जे सहप्रवासी म्हणून होते त्यांनी रिक्षा  भागात वळवली. दोन आरोपींनी महिलेला धमकावलं.स्क्रू ड्रायव्हरच्या धाकावर तिला कपडे उतरवण्यास सांगितले. 30 मिनिटांच्या रिक्षा प्रवासामध्ये तिला दोघांनी छेडण्याचाही प्रयत्न केला. ‘ असं मनपाडा पोलिस स्टेशनचे इन्सपेक्टर राम चोपडा म्हणाले.

रिक्षामध्ये असताना महिला हात बाहेर काढत मदत मागण्याचा प्रयत्न करत होती पण सहप्रवासी तिला रोखत होते. परंतू सुदैवाने ऑन ड्युटी असलेल्या अतुल भोईये आणि सुधीर हसे या पेट्रोलिंग पोलिसांनी तिचा हात पाहिला होता त्यांनी रिक्षाचा पाठलाग सुरू केला.

पोलिस पाठलाग करत आहे हे पाहताच रिक्षा चालकाने वेग वाढवला आणि विवस्त्र अवस्थेत महिलेला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनगटाला काही जखमा आहेत.

पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं एकाने पोलिसांवरही स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने तो परतावून लावला. दोन आरोपींवर यापूर्वी देखील 3 क्रिमिनल केसेस आहेत. यामध्ये चोरीचे गुन्हे आहेत. आरोपींवर आता पोलिसांनी कलम 366, 365, 354, 354 (a)(b), 332, 337, 506 (2), 323, आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close