खेळ व क्रीडा

हिंगण्यातील शासकीय निवासी शाळेच्या मुलींचे सुयश

Spread the love

सतीश भालेराव नागपूर:– दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे आयोजित आंतरशालेय तालुकास्तरीय स्पर्धेत 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेने बाजी मारली. तसेच याआधी याच स्पर्धेअंतर्गत क्रीडा संकुल वानाडोंगरी येथे घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील कबड्डी आणि खो-खो स्पर्धेचे तालुकास्तरीय विजेतेपद सुद्धा सदर शाळेच्या मुलींनी पटकावले आहे.

ऍथलेटीक्स स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये जानवी सावसाकडे (600 मी. धावणे) प्रथम, जयश्री वैद्य,वेदिका चव्हाण (400 मी.) अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय, प्राची राठोड (गोळा फेक) द्वितीय, प्राची रंगारी , प्राची राठोड (200 मी. धावणे) अनुक्रमे प्रथम व द्वितीय, प्राची राठोड (लांब उडी) प्रथम, वेदिका चव्हाण (थाळी फेक) द्वितीय, जानवी सावसाकडे (थाळी फेक) तृतीय, प्राची राठोड ,प्राची रंगारी,जयश्री वैद्य ,जानवी सावसागडे (4×100 रिले) प्रथम,
जयश्री वैद्य (80 मी. हर्डेल)द्वितीय, अशा विविध खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये झेप घेतली आहे.

17 वर्षाखालील वयोगटामध्ये श्रावणी कांबळे (800 मी. धावणे) द्वितीय, श्रावणी कांबळे (400 मी. धावणे) तृतीय, श्रावणी श्रीरामवार (भालाफेक) प्रथम, कांचन वैद्य, अम्रीजा कुमारी, उर्वशी दुधे ,श्रावणी कांबळे (4×100) द्वितीय अशा विविध खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या विशेष कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका दुशीला मेश्राम (दरेकर) यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे शिक्षक पंकज लेदाडे, विजेश आडे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close