सामाजिक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढोना येथे डॉक्टर्स डे साजरा
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आर्वी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढोणा कन्या येथे एक जुलै डॉक्टर्स डे तसेच कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त वाढोना गावामध्येच बऱ्याच वर्षापासून सेवा देत असलेले डॉक्टर विशाल राठोड यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ तसेच पुस्तक देऊन करण्यात आले .त्यांनी डॉक्टर्स डेनिमित्त एक ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना हेल्थ अँड हायजिन स्वतःच्या आरोग्य कसे प्रकारे चांगले ठेवू शकतात याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापिका प्रज्ञा बागेसर होत्या तर कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु. भारती सानप यांनी केले
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1