आत्या सोबत गेलेली पुतणी परतली तेव्हा तिच्या गळ्यात होते मंगळसूत्र आणि मांगेत सिंदुर
लखिसराय (बिहार)/ नवप्रहार मीडिया
आत्या सोबत गेलेली मुलगी परत आली तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि मांगेत कुंकू होत. तिचा हा अवतार पाहून घरच्यांना धक्काच बसला. तिला जेव्हा याबद्दल विचारले तेव्हा तिने जे सांगितले ते ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली.
या विचित्र घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सुर्यगड ठाण्याच्या हद्दीतील अश्विनी ( काल्पनिक नाव ) आत्या जानकी सोबत बाहेर गेली होती. मुलगी रात्री घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. दोन दिवस वाट पाहून देखील मुलगी घरी परतली नसल्याने अश्विनी क्या कुटुंबीयांनी पोलिसात तिच्या अपहरणाची शंका वर्टवित तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. पण ती सापडली नाही. शेवटी पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर केल्यावर दोघी परत आल्या.
दोघी परत आल्यावर झाला समलैंगिक संबंधांचा खुलासा – पोलिसांचा दबाव वाढल्यावर दोघी परत आल्या. तेव्हा त्यांनी घरच्यांना आणि पोलिसांना सांगितले की त्यांनी लग्न केले आहे. लग्नानंतर त्या दिल्ली येथे राहत होत्या.
जिल्ह्यातील हे तिसरे प्रकरण – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जिल्ह्यातील तिसरे प्रकरण आहे. जमुई क्या लक्ष्मीनगर भागातील तरुणीने लखीसाराय येथील हलसी येथील तरुणी सोबत मंदिरात लग्न केले होते. कुटुंबियांच्या ढाकणे त्या पटणा पळून गेल्या होत्या.
त्यात वाईट काहीच नाही – या प्रकरणातील तरुणींचे म्हणणे आहे की यात वाईट काहीच नाही. कारण न्यायालयाने अश्या सबंधाला मान्यता दिली आहे. आणि अभिव्यक्ती स्वतंत्रा नुसार त्यांना मंनाप्रमाने जगण्याचा आधिकार आहे.