मुबाईच्या अल्पवयीन मुलीवर पददुचेरीत। सामूहिक बलात्कार
चेन्नई / नवप्रहार डेस्क
दिवाळी च्या सुटीत अनेक कुटुंब फिरायला बाहेर किंवा नातेवाईकांकडे जात. सुटीत कुठेतरी फिरायला न्याव अशी मुलांची आईवडिलां कडून अपेक्षा असते. मुंबईतील असंच एक कुटुंब आई, वडील आणि त्यांची 16 वर्षांची मुलगी दिवाळी साजरी करायला म्हणून पद्दुचेरीत आपल्या नातेवाईकांकडे गेले.पण तिथं भयंकर घडलं. 16 वर्षांच्या मुलीवर ऑटो ड्रायव्हर आणि 6 पर्यटकांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक बाब समोर आली आहे.
मुंबईहून पद्दुचेरीत गेलेली 16 वर्षांची मुलगी जिच्या आईवडिलांनी 31 नोव्हेंबरला ती बेपत्ता असल्याची तक्रार ग्रँड बाजार पोलिसात दिली होती. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. 2 नोव्हेंबरला ही मुलगी पद्दुचेरीत बीच रोडवर सापडली. तिच्यावर ऑटो ड्रायव्हर आणि पर्यटकांनी बलात्कार केला होता.
मुलगी पद्दुचेरीत आपल्या आईवडिलांसह नातेवाईकाच्या घरी राहत होती. 30 ऑक्टोबरला ती पालकांशी भांडून रात्री 9 च्या सुमारास घराबाहेर गेली. तिथं ती मोईनुद्दीन नावाच्या ऑटोचालकाच्या ऑटोत बसली. तिनं त्याला आपल्याला पर्यनटस्थळी न्यायला सांगितलं. पण त्याने तिला चेन्नईत कोट्टाकुप्पम इथं आपल्या घरी नेलं. तिला दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला ऑरोविल्लेला सोडलं.
चेन्नईतील पर्यटकांनी तिला सेरेनिटी बीचवर पाहिलं तिच्याशी मैत्री केली. आपल्याला चेन्नईत एका फ्रेंडच्या घरी जायचं असल्याचं तिनं सांगितल्यावर तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी तिला त्यांना ऑफिसमार्फत देण्यात आलेल्या रूममध्ये नेलं. तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. 2 नोव्हेंबरला त्यांनी तिला एका कॅबमध्ये बसवून पद्दुचेरीत बीच रोडवर सोडलं.
दरम्यान याप्रकरणात एकाला आंध्र प्रदेशमधून तर दोघांना ओडिशातून अटक करण्यात आली आहे. तर तिघांचा शोध सुरू आहे. ऑटो ड्रायव्हरला अटक करून तुरुंगात टाकलं आहे. चौकशीत त्याने तिला घरी नेण्याआधी गेस्टहाऊसमध्ये नेऊनही तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.