सामाजिक

खासदार सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात होणार सांगता

Spread the love

 

7 व 8 ऑक्टोबरला साकोलीत समारोपीय सोहळा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी):* )केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून आणि खासदार सुनिल मेंढे संकल्पनेतून साकारलेल्या वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा सांगता समारोह 7 व 8 ऑक्टोबर रोजी साकोली येथील परेड ग्राउंड येथे होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोपीय कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील सांस्कृतिक वारसा जपला जावा, प्रतिभावंत कलाकारांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात हा सांस्कृतिक महोत्सव राबविला. महोत्सवा दरम्यान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी युवक, युवती आणि महिलांचे समूह नृत्य स्पर्धा घेतल्या गेल्या. परंपरागत आदिवासी नृत्य प्रकाराचा समावेश या महोत्सवात करण्यात आला होता. महिला, युवक आणि युवती अशा तीनही गटात तालुकास्तरावर विजेत्या समूहांना आकर्षक बक्षीस देण्यात आले होते. जवळपास 5700 च्या आसपास स्पर्धक कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. सोबतच 25 हजाराहून अधिक प्रेक्षकांनी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा आनंद लुटला होता.
प्रत्येक तालुक्यातील विजेत्या समूहांना लोकसभा स्तरावर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याच्या दृष्टीने लोकसभा स्तरीय कार्यक्रम आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा समारोपीय सोहळा 7 व 8 ऑक्टोबर रोजी साकोली येथील होमगार्ड परेड मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक असे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी 2 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित राहतील. तर समारोपाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित राहणार आहेत. दोन्ही दिवस ब्रिटन गॉट चॅलेंज 2020 चा विजयी समूह x1x आकर्षक अशा नृत्य अविष्काराचे सादरीकरण करणार आहे. दोन्ही दिवस लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यातून विजयी होत लोकसभा स्तरावर दाखल झालेल्या 108 समूहांचे आकर्षक नृत्याविष्काराचा आस्वादही घेता येणार आहे. नागरिकांनी आणि नृत्य प्रेमींनी दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावावी, असे आवाहन खा.सुनील मेंढे यांनी केले आहे.
….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close