मोवाडा (मो) शाळेत शिक्षण परिषद संपन्न
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मोवाडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ मडावी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमुख अतिथी सौ.ललीताताई बहेकार,सरपंच सौ.सुरेखाताई सुरपाम उपाध्यक्ष शा.व्य.समिती श्री किसनराव किनाके केंद्रप्रमुख श्री राजु उपरीकर,मुख्याध्यापक श्री सुनील भोंग,मु.अ.श्री एन टी मेश्राम,श्री नंदकुमार बुरबुरे, मार्गदर्शक श्री मनोज गवळी श्री मनोज कहाळे आणि केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषदेत विद्या समीक्षा केंद्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.श्री किसनराव किनाके केंद्रप्रमुख यांनी समग्र शिक्षा उपकार्यालय पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र उभारण्यात आले आहे. शिक्षण विभागातील विविध संस्थांच्या समन्वयाने विद्या समिक्षा केंद्रांतर्गत उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे असे मार्गदर्शनातून आपले मत व्यक्त केले.विद्या समीक्षा उद्बोधन व पूर्व ज्ञान चाचणी या विषयावर प्रथम सत्रात श्री मनोज कहाळे यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.विद्या समीक्षा केंद्र भूमिका व महत्त्व या विषयावर व्दितीय सत्रामध्ये श्री मनोज गवळी यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन करुन प्रत्यक्षात कृती कार्यक्रमाचे सादरीकरण केले.टिटवी शाळेतील शिक्षिका कु.प्रियाली विरदंडे शालेय व्यवस्थापन परीक्षेत प्रथम आल्या बद्दल सत्कार ही करण्यात आला.तसेच मोवाडा शाळेतील शिक्षिका कु.उज्वला शेंडे प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या त्यांचा ही सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधाकर राठोड आणि प्रास्ताविक श्री राजु उपरीकर मुख्याध्यापक यांनी केले. उध्दघाटनीय कार्यक्रमाचे आभार श्री नितीन मुद्देलवार यांनी मानले तर समारोपीय कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पुंडलिक कुलमुलकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री राजु उपरीकर, नितीन मुद्देलवार,गणेश आत्राम,कु.सुरेखा राठोड,माया भेंडारकर,उज्वला शेंडे यांनी परिश्रम घेतले.