बोरगांव ग्रामपंचायत कडून दुर्लक्षित झालेल्या रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेशरमाचे झाडे लावून आंदोलन
पांढरकवडा— आज बोरगांव ग्रामपंचायत कडून दुर्लक्षित झालेल्या रस्त्यावर बेशरमचे झाडे लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे केळापूर तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोर्चा काढून नाली,रस्ते व पाणी संबधीत निवेदन दिले. यावर सचिव,सरपंच व सदस्य यांचे असे म्हणणे होते की गावातील लोक टॅक्स भरत नसल्यामुळे आम्ही नालेसफाई करू शकत नाही.टॅक्स जमा झाल्यावर नालेसफाई करून देऊ. व 15 वित्त आयोगाच्या रकमेतून नालेसफाई, रस्तेदुरुस्ती करू नका असे B.D.O. साहेबांनी सांगितले आहे. निधी खर्च न केल्यामुळे तो निधी शासनाला परत जातो. गावात नाली,रस्ते व पाण्याच्या एवढ्या समस्या असताना १५ वित्त आयोगाच्या निधीचा वापर करू नका असे सांगू तरी कसे शकतात ?असा प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्यासाठी निधी उपलब्ध नसताना जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी चांगल्या अवस्थेत असलेले सिमेंट रस्ते फोडून पाईप लाईन टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली. आता रस्ते दुरुस्तीची मागणी केली असता पाईप लाईन टाकणारा ठेकेदार करून देईल असे सांगितले. २०२१-२२ मधील कचरा कुंडी खरेदीवर जवळपास अडीच लाख रुपये खर्च करण्यात आला त्या कचरा कुंड्याचे काय झाले विचारले असता माहितीचा अधिकार टाका त्यावर आम्ही सांगू असे ग्रामपंचायत सदस्याचे म्हणणे होते. ज्याप्रकारे मुलांची गँग करून मोर्चा काढला तसेच टॅक्स वसुलीसाठी फिरा असे सरपंचाचे म्हणणे होते. घरटॅक्स वसुलीची अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करत आहेत तर ग्रामपंचायत कर्मचारी कशासाठी व त्यांना पगार कशासाठी? गावात एवढ्या समस्या आहेत तर आजपर्यंत ग्रामपंचायत कोणती कामे करण्यात व्यस्त आहे? असे एक ना अनेक प्रश्न गावकऱ्यांचे आहेत या प्रसंगी मनसेचे शाखा अध्यक्ष निकेश कुळसंगे,प्रवीण सिडाम,रोहित जवादवार,लखन सोयाम,अनिकेत बोबडे,प्रज्योत कडू,निलेश जाधव,आकाश नैताम,कुलदीप वासेकर, दानिश शेख,नामदेव ठाकरे,पिंटू चिकटे,करण कुळसंगे ,हिरामण पेंदोर,किसन डोळसकर,रमेश जाधव,अरुण कुळसंगे
यांच्या सह समस्त गावकरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व सहकारी उपस्तीत होते