अजय देशमुख भारत सरकार ग्राम विकास मंत्रालय च्या पुरस्काराने सन्मानित
अंजनगाव सुर्जी ( मनोहर मुरकुटे )
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापुर येथील रुग्ण सेवक अजय देशमुख यांना दिल्ली येथे नुकताच भारत सरकार ग्राम विकास मंत्रालय केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कृषी भवन न्यु दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले अजय देशमुख सामाजिक कार्यकर्ते असुन युवा स्वाभिमान पार्टीची रुग्णवाहिकेचे चालक म्हणून स्वयंम सेवा देत आहेत त्यांनी आज पर्यंत अनेक अपघात ग्रस्तांना जिवदान देण्याचे कार्य केले असून विविध सामाजिक उपक्रम राबवुन गोरगरीब जनतेची सेवा केली आहे या कार्याची दखल भारत सरकार ग्रामविकास मंत्रालय यांनी घेऊन अजय देशमुख यांना केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते न्यु दिल्ली कृषी भवन येथे आरोग्य सेवक म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार देशातील 30 व्यक्तींनाच प्रदान करण्यात आल्याचे यावेळी अजय देशमुख यांनी सांगितले .यावेळी अमरावती लोकसभा सदस्य सौ नवनित राणा यांच्यासह मंगेश कोकाटे खासदारांचे स्वीय सहायक, विठ्ठल ढोले निलेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते