मोटार सायकल चोर आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार

अमळनेर /.प्रतिनिधी
बाईक चोरट्यांना तुरुंगात घेऊन जात.असताना पोलिस वाल्यांना चहा पिणे महागात पडले आहे. पोलिस चहा पिण्यासाठी थांबले असताना दोन्ही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाले आहे.
अमळनेर येथून नंदुरबारकडे दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना कारागृहात घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. फरार आरोपींचे नाव हिम्मत पावरा आणि अंबालाल भुरट्या असं आहे.
जळगाव मध्ये चहाची तलफ पोलिसांना चांगलीच महागात पडली असून तब्बल 24 मोटरसायकली चोरणाऱ्या आरोपींना नंदुरबार कारागृहात नेत असताना चहा पिण्यासाठी थांबलेल्या पोलिसांच्या तावडीतून दोन आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाले आहे. अमळनेर येथून नंदुरबारकडे आरोपींना घेऊन जात असताना दावडे गावाजवळ ही घटना घडली असून या घटनेनंतर फरार आरोपींच्या शोधासाठी अमळनेर धुळे व नंदुरबार पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिसांनी गेल्या काही दिवसापूर्वी तब्बल 24 मोटरसायकली चोरी करणारे अट्टल चोरटे अंबालाल खर्डे व हिम्मत पावरा या दोघांना नंदुरबार जिल्ह्यातील सात पिंपरी या डोंगर परिसरातून अटक केली होती. त्यांच्याकडून चोरी केलेल्या 24 मोटरसायकली अमळनेर पोलीससाठी जप्त केल्या होत्या या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते व न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
मात्र जळगाव कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक बंदी असल्याने या दोन्हीही अट्टल दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना नंदुरबार कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यानुसार अमळनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस वाहनाद्वारे या आरोपींना नंदुरबारकडे घेऊन जात असताना दावडे गावाजवळ असलेल्या एका चहाच्या दुकानावर चहा घेण्यासाठी थांबले मात्र त्याचवेळी या दोन्हीही अट्टल चोरट्यांनी रस्त्यालगत असलेल्या झाडांमध्ये पळ काढला.




