क्राइम

मामीने भाच्याला संपवले ‘ हे आहे त्यामागील कारण

Spread the love

जळगाव / नवप्रहार मीडिया

                    जुनी माणसं नेहमी म्हणायची की पैसा ही अशी गोष्ट आहे जी आपसी संबंध खराब करतो. पण असे असतांना सुद्धा अडीअडचणीच्या वेळी एकमेकांच्या कामी पडणे हा मानवी गुणधर्म. परंतु पैशाच्या देवानिघवाणी वरून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आणि हे काम अन्य कुणी नाही तर त्याच्या मामीने केले आहे. नजीर शेख असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असुन  नजीर ने  मामे बहिणीच्या विवाहासाठी मामीला उधार पैसे दिले होते, ते पैसे वापस मागितल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली आहे.

उपलब्ध माहिती नुसार , नजीरने आपल्या मामे बहिणीच्या विवाहासाठी उधारीवर पैसे दिले होते. त्याने मामीकडे आपले पैसे परत मागितले. पैसे परत मागितल्याचा राग आल्याने मामीने आपला भाऊ आणि भाच्याच्या मदतीने तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नजीर शेख याचा मृत्यू झाला आहे. मामीनेच आपल्या भाच्याची हत्या केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close