जीवनदान ट्रस्टच्या वतीने शासकीय रुग्णालयात होते रोजअन्नदान

यवतमाळ ( वार्ता )
अरविंद वानखडे
यवतमाळ येथील जीवनदान ट्रस्ट, एक सामाजिक जबाबदारी म्हणून यवतमाळ येथील शा सकीय रुग्णालयात गेली अनेक वर्षापासून रुग्णांच्या नातेवाईकांना चांगल्या पद्धतीचे भोजन रोज सकाळी साडेनऊच्या दरम्यान वाटप करण्यात येत असते.
जीवनदान ट्रस्ट ही यवतमाळ मध्ये कोरोना काळापासून, अनेक गरजूंना मोफत जेवणाची व्यवस्था करून देत असून, आवश्यकतेनुसार रस्त्यावरील असलेल्या ज्यांना निवारा नाही अशा लोकांना थंडीच्या काळामध्ये ब्लॅंकेट चादरीचे वाटप करून त्यांना मदतीचा हात देत असतात. एवढ्यावरच ही संस्था थांबत नसून गरजूवंतांना, साड्या, शालेय उपयोगी वस्तू, तसेच ज्यांच्या पायात चप्पल नाही अशा लोकांना चपला पुरवितात.
जीवनदान ट्रस्टचे अध्यक्ष नीलिमाताई जाधव, या ट्रस्टचे सर्व सूत्रधार, ओमकार सोनवणे सर सांभाळत असून, आजच्या अन्नदान वाटपामध्ये ट्रस्टचे कार्यकर्ते श्री सुरजराव लोंढे साहेब, कुमारी श्रेया आतकर, किरण निसरते, कुमारी सानवी पोयाम यांचा सहभाग होता.