विदेश

सासऱ्याने केली नातवाच्या DNA टेस्ट ची मागणी अन समोर आला सासूचा कारनामा

Spread the love

                    DNA म्हणजे  डिओक्सिरायबो न्यूक्लिक एसिड मानवाच्या शरीरात असलेल्या जीन्स बद्दल या टेस्ट मधून माहीत पडते. आई वडिलांचे जीन्स हे मुलात येतात. अनेक वेळा मुलाची खरी ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केल्या जाते. एका सासऱ्याने आपल्या नातवाची DNA  टेस्ट करण्याची गळ घातली. पण यानंतर जे समोर आले ते हादरवून टाकणारे होते. नातवाचा बाप म्हणजे सासऱ्याचा मुलगा हा त्याच्या नसून त्यात अन्य कोणाचे जीन्स आढळून आल्याने सासूच्या अवैध संबंधाची पोलखोल झाली आहे. 
 परदेशात आता डीएनए टेस्ट सामान्य बाब झाली आहे. लोक त्यांना वाटेल, तेव्हा डीएनए टेस्ट करतात. खासकरुन डीएनए टेस्ट पितृत्वाची ओळख पटवण्यासाठी केली जाते. काही लोक मजा-मस्करी म्हणून पण ही टेस्ट करतात. पण अनेकदा यामध्ये ते अनेकदा आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतात. डीएनए  टेस्टमधून अनेकदा अशी काही रहस्य समोर येतात की, त्यामुळे संपूर्ण कुटुंब कोलमडून पडतं. असच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे.
एका महिलेने सांगितलं की, सासऱ्याने नातवाची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली. पण चुकून त्यातून सासऱ्याच्या पत्नीच्या अफेयरचा खुलासा झाला. पितृत्व परीक्षणचा रिझल्ट समोर आल्यानंतर संपूर्ण कुटुंबात मोठा गदारोळ झाला. प्रत्येकजण हैराण होता. मिररमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झालं आहे. महिलेने सांगितलं की, “सासऱ्याने तिच्या नवऱ्याच्या डोक्यात टाकलं की, त्यांचा मुलगा सूनेच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलाय. जो पर्यंत आम्ही डीएनए टेस्ट करणार नाही, तो पर्यंत संपत्तीत अधिकार मिळणार नाही, असं सांगितलं” त्यावरुन मुलगा आणि वडिलांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर महिला पतीसोबत वेगळी राहू लागली.

काही वर्षानंतर सासऱ्याच्या सांगण्यावरुन ती पतीसोबत सासऱ्याच्या घरी रहायला गेली. मुलासाठी फंड बनवायचा आहे असं सांगून सासऱ्याने पुन्हा एकदा नातवाच्या डीएनए टेस्टची मागणी केली. माझ्या नवऱ्याने आणि मी या बद्दल चर्चा केली व डीएनए चाचणी करण्याच मान्य केलं. पण पुढे जे झालं, त्यासाठी कोणी तयार नव्हतं. टेस्टमध्ये समजलं की, मुलगा पतीपासूनच झाला आहे. पण ते मूल अनेक पितृक नातेवाईकांशी रिलेट करत नव्हतं. म्हणून सासऱ्याने पुन्हा या महिलेवर आरोप केले.

संपूर्ण कुटुंब शॉकमध्ये

महिलेने खुलासा केला की, तिच्यावर झालेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा DNA टेस्ट झाली. त्यातून समजल की, तिचा नवरा हा सासऱ्याचा मुलगाच नाहीय. त्याचे पितृक वडिल कोणीतरी वेगळेच होते. म्हणजे सासऱ्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब शॉकमध्ये आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close