हटके

सासू सासरे नको म्हणणाऱ्या सुनेला न्यायालयाने पोटगी नाकारली

Spread the love

नागपूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

          वर्तमान काळात संयुक्त कुटुंब ही परिभाषा लोप पावत चालली आहे. मुलींना राजा आणि राणीचा संसार पाहिजे.मुलींना स्वतःच्या माहेरच्या मंडळी शिवाय इतर कोणी नको आहे. अश्याच एका प्रकरणात पोटगी मागणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाने धडा शिकवत तिची ती मागणी नाकारली आहे.

प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. पत्नी महानुभाव पंथाची अनुयायी आहे. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. त्यामुळे पती व सासू-सासरे छळ करीत होते. त्यांनी तिला घराबााहेर काढल्याने ती माहेरी निघून गेली, असा आरोप केला गेला होता; परंतु आरोप सिद्ध झाले नाहीत.

पत्नीने कुटुंब न्यायालयात दिलेल्या जबाबावरून, तिची पतीविरुद्ध तक्रार नाही, हे दिसून आले; तिला सासू-सासरे नको आहेत. तिला केवळ पतीसोबत राहायचे आहे, हे आढळले. २०१० मध्ये पत्नी माहेरी गेली होती. ती पतीसोबत परतली. छळ झाला असता, तर तिने सासरी येण्याचा निर्णय घेतला नसता, याकडे निर्णय देताना लक्ष वेधण्यात आले. पत्नी आठवड्यातून तीन दिवस महानुभावपंथीय मंदिरात जात होती. त्यावरून तिला मंदिरात जाण्याची मुभा होती, हे स्पष्ट झाले.

पत्नी कोणत्याही ठोस कारणांशिवाय पतीपासून वेगळी झाली आहे. पतीने तिला सासरी परत आणण्याचे प्रयत्न केले; पण तिने प्रतिसाद दिला नाही. पतीने स्वत:हून पत्नीची देखभाल करणे टाळले नाही. त्यामुळे तिला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
nकुटुंब न्यायालयाने ९ मे २०१४ रोजी पत्नीची मासिक पाच हजार रुपये पोटगीची मागणी नामंजूर केली होती. त्यामुळे तिने न्यायालयात धाव घेतली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close