ती प्रियकरा सोबत करत होती दारू पार्टी तितक्यात आला पती अन…..

करनाल / प्रतिनिधी
पती मानसिक दृष्ट्या कमकुवत असल्याचा फायदा उचलत पत्नी प्रियकराला घरी बोलावून दारू पार्टी करत होती. पती तिचा विरोष करण्यास मानसिक दृष्ट्या सक्षम नव्हता. एक दिवस ती आपल्या प्रियकरासह दारू पित असतांना पती घरी आला. त्याम तिला जेवायला मागितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. प्रियकर मधात आला असता नवऱ्याने त्याच्या डोक्यात काठीने प्रहार केले त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करून पत्नीने पळ काढला होता. पोलिसांनी महिलेचा मग काढत तिला अटक केली आहे. घक्तना संगोहा गावातील आहे.
हरियाणाच्या करनाल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक हत्या झाली होती. एक महिला आणि तिचा प्रियकर घरात दारूपार्टी करत असताना आलेल्या महिलेच्या पतीनं प्रियकरावर हल्ला केला. त्या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या पत्नीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्येनंतर आरोपी पती घरातच होता, तर पत्नी फरार झाली होती. आरोपीचं मानसिक संतुलन ठीक नव्हतं. यामुळे पोलिसांना नेमकी माहिती मिळू शकत नव्हती.
पोलिसांनी पळून गेलेल्या महिलेचं लोकेशन ट्रेस केलं. तेव्हा ती मुंबई-कटरा स्वराज एक्स्प्रेसनं पळून जात असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी जीआरपीला त्याबाबत माहिती दिली. जीआरपीनं रेल्वेच्या चालकाला पुढच्या स्टेशनवर रेल्वे थांबवण्यास सांगितलं. जीआरपीच्या टीमनं डब्यांमध्ये घुसून तपास सुरू केला. पोलिसांना पाहून ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. एका पोलीस कर्मचाऱ्यानं तिला पाहिलं. फोटो पाहून खात्री झाल्यावर तिला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संगोहा गावात राहणारी झरिना खान उर्फ रानी आणि शाहपूर गावात राहणाऱ्या कृष्ण पैलवान यांचे अनैतिक संबंध होते. नवरा घरात असतानाही तो प्रियकर पत्नीला भेटायला घरी येत असे. पती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने तो फारसा विरोध करू शकत नव्हता. त्याचा फायदा पत्नी व प्रियकरानं घेतला. गेल्या मंगळवारी (9 जानेवारी) कृष्ण पैलवान राणीला भेटायला घरी आला. दोघं घरात दारू पार्टी करत होते. तेव्हा राणीचा नवरा तिथे आला. त्यानं जेवायला मागितलं. त्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झालं. त्यामुळे पैलवान त्यांच्यात पडला. यामुळे भडकलेल्या पतीने पैलवानाच्या डोक्यात काठीनं मारलं. त्यात त्याचा मृत्यू झाला.
प्रियकराचा मृत्यू झाल्याचं कळताच पत्नीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना फोन करून त्याबाबत माहितीही दिली. मात्र त्याच्या घरचे कोणीही आले नाहीत. मग नवऱ्याला तिथेच सोडून पत्नी तिथून फरार झाली. दुसऱ्या दिवशी माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी आले. पैलवान आणि राणी बऱ्याच काळापासून एकमेकांना भेटत होते असं गावकऱ्यांनी सांगितलं. त्यावरून पोलिसांनी राणीचा शोध घेतला व तिला अटक केली.