भूमी अभिलेख मार्फत मोजणी केलेल्या नकाशाची मोजणी फी भरून 8 ‘अ’ वाटप करा.
न.प मुख्याधिकारी यांना निवेदन,माकप चा तीव्र आंदोलनाचा इशारा.
नांदगाव खंडेश्वर / प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन सादर करण्यात आले. नांदगाव शहरात अतिक्रमण करून राहत असलेल्या घरांची भूमी अभिलेख कार्यालय मार्फत मोजणी करून नकाशे तयार करण्यात आले. दोन वर्ष उलटून सुद्धा अद्यापही लोकांना गावं नमून आठ देण्यात आलेला नाही. 6,77.000 / हजार नगरपंचायत मार्फत तातडीने भूमी अभिलेख कार्यालयास भरण्यात यावे.ही मागणी मा क प च्या वतीने करण्यात आली. मौजा नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अंतर्गत गावठाण तथा शासकीय जागेत इमला उभारून गेली 30-40 वर्षापासून राहणाऱ्या भोगवटा धारकांचा भूखंड कायम करून गाव नमुना 8 ‘अ ‘मिळावा यासाठी माकपने सातत्याने नागरिकांना सोबत घेऊन आंदोलने केली, सातत्यपूर्ण आंदोलने व पाठपुराव्याने भूमी अभिलेख कार्यालयाने संदर्भ क्रमांक 1 च्या पत्रानुसार मोजणी पूर्ण केली. परंतु नगरपंचायतच्या नाकारत्यां धोरणा मुळे शहरातील अतिक्रमण धारक नागरिक गाव नमुना 8’अ ‘पासून वंचित राहिले आहे. संदर्भ 2, मधील पत्रात नमूद असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्रत्यक्ष जागेवर जावून 676 अतिक्रमित धारकांच्या घराची मोजणी केली. सदर भूखंडाची मोजणी 6,77000 / एवढी मोजणी फी होती. सदर मोजणी फी भरण्याचे आपणास कळवून मोजणी सीट पुरविण्यात येईल असे सांगितले होते. नगरपंचायत कार्यालयाने 17 महिने जास्त उलटूनही मोजणी फी भरलेली नाही. त्यामुळे भोगवटाधारकांना गाव नमुना 8’अ ‘ अद्यापही मिळालेलं नाही गेल्या सात वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संघर्षाने शहरातील अतिक्रमितधारकांना न्याय मिळाला आहे. नगरपंचायत ने तातडीने पैसे भरून शहरातील जनतेला न्याय द्यावा अन्यथा जनतेला एकत्रित करून माकप पुन्हा संघर्षाचा मार्ग निवडेल, निवेदन देतेवेळी तालुका सचिव श्याम शिंदे,विजय सहारे, शत्रुघ्न मगर, सुरेश हळदे, ज्ञानेश्वर पाटमासे, दीपक अंबाडरे, असलम हमीद खान, अनिल मारोटकर, मारुती बंड, शकील भाई, इस्माईल शाह,आदी अतिक्रमण धारक उपस्थित होते