हज यात्रेसाठी जाणारे मोहसीन चव्हाण व त्यांचा कुटुंबियांचा सत्कार
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
इस्लाम धर्मातील पाच कर्तव्या पैकी हज यात्रा हे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जातात.आयुष्यात एकदातरी हज यात्रा घडावी व हज ला जाऊन मुस्लिम बांधव आपले धार्मिक कर्तव्य पार पाडवे असे प्रत्येक मुस्लीम बांधवांच्या मनात असते. इसवी सन 628 साली महम्मद पैगंबरांनी 1400 अनुयायांना घेऊन ही हज यात्रा सुरू केली होती. इस्लाम मध्ये पहिली तीर्थयात्रा काबामध्ये पैगंबर इब्राहिम यांनी ही परंपरा कायम ठेवत सुरू केली त्यालाच हज म्हणून म्हणतात. मुस्लिम बांधवा साठी पवित्र असलेले मक्का या शहरात लाखो मुस्लिम या निमित्ताने एकत्र येतात. तो उत्सव पहाण्या सारखा असतो. या वर्षी हज यात्रे करिता एक घाटंजी शहरातील सना मोबाइल शॉपचे संचालक अक्रम चव्हाण यांचे मोठे बंधू मोहसीन चव्हाण व आई आणि त्यांचे कुटुंबीय हज यात्रेसाठी जात असल्याने त्यांचा घाटंजी येथील कुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे व मध्यवर्ती बँकेचे विभागीय अध्यक्ष आशिषबाबु लोनकर,उद्योजक राम अग्रवाल यांनी हज यात्रेला रवाणा होण्यापुर्वी मोसीम चव्हाण व त्यांच्या कुटूंबीयाचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी निजाम चव्हाण, मानु बाबू चव्हाण, अकबर तंवर, जब्बार भाई, हाजी निजाम सर्वे, हाजी अमीन मलनस, हाजी अन्सार भाटी, लियाकत तंवर, डॉक्टर तंवर, संजु आडे, बाबु बैलीम या सह घाटंजी शहरातील मुस्लिम व इतर समाज बांधव नागरिक तसेच चव्हाण यांचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.