क्राइम

मॉडेल दिव्या पाहुजा ची हत्या हॉटेल मालक अभिजित सिंह ने केली

Spread the love

लिव्ह इन मध्ये राहत होती दिव्या , पोलीस तपासात उघड

गुरुग्राम / नवप्रहार मिडीया

मॉडेल दिव्या पाहुजा हत्याकांडाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून तिची हत्या हॉटेल मालक अभिजित सिंह याने केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ती गेल्या तीन महिन्यांपासून अभिजित सिंह यांच्या सोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. ती जेलमध्ये बंद असलेल्या गँगस्टर बिंदर गुर्जरच्या सांगण्यावरून ती हॉटेल मालक अभिजीत सिंहला भेटली

 लिव्ह-इन मध्ये राहाताना  दिव्याने अभिजीतचे अश्लील व्हिडीओ तिच्या मोबाईलमध्ये कैद केले होते. दिव्या त्याबद्दल अभिजीतला ब्लॅकमेल करत होती. यामुळेच अभिजीतने दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या केली. डीसीपीचे म्हणणे आहे की, ज्या बीएमडब्ल्यू कारमधून हत्येनंतर दिव्याचा मृतदेह नेण्यात आला होता ती पंजाबमधील पटियाला बसस्थानकावरून जप्त करण्यात आली आहे. त्या कारची डिकी उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

27 वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची मंगळवारी रात्री उशिरा गुरुग्राममधील हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली होती. दिव्या ही यापूर्वी गँगस्टर संदीप गाडोलीची गर्लफ्रेंड होती. दिव्याच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी हॉटेल मालक अभिजीत सिंह आणि हॉटेल कर्मचारी ओम प्रकाश आणि हेमराज यांना अटक केली. ओमप्रकाश आणि हेमराज यांनी दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती.

हॉटेल मालक अभिजीत सिंहने दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या साथीदारांना 10 लाख रुपये दिले होते. दिव्याचा मृतदेह अभिजीतच्या बीएमडब्ल्यू कारच्या डिकीमध्ये टाकून अभिजीतचे दोन साथीदार पळून गेले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अभिजीतला ब्लॅकमेल करत होती दिव्या

हत्येतील मुख्य आरोपी अभिजीत सिंह याने हॉटेल सिटी पॉइंटचा मालक असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. या हॉटेलमध्ये दिव्याची हत्या करण्यात आली. अभिजीतने गुरुग्राम पोलिसांना सांगितले की, त्याचे काही अश्लील फोटो दिव्या पाहुजासोबत होते. याच्या माध्यमातून ती ब्लॅकमेल करत होती.

दिव्याने अनेकदा यासाठी त्याच्याकडून पैसे घेतले होते. यावेळी ती मोठी रक्कम मागत होती. 2 जानेवारी रोजी तो दिव्याला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि फोटो डिलीट करण्यास सांगितले. तिच्या मोबाईलचा पासवर्ड विचारला असता तिने सांगितले नाही. याचा राग आल्याने अभिजितने रागाच्या भरात दिव्यावर गोळी झाडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close