राजकिय

उद्या होणाऱ्या शपथविधीत हे आमदार घेऊ शकतात शपथ 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                 मागील काही दिवसांपासून लटकलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा उद्या मुहूर्त निघाला आहे. उद्या महायुती सरकार मधील मंत्र्यांचा शपथविधी दु. १२ वा. राजभवनात होणार आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. उद्या १५ ते २० मंत्र्यांचाच शपथविधी होणार आहे. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ८ ते १० मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे ५-५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाकडे कोण कोणती खाती जाणार? याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला मिळणार मंत्रि‍पदे?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी चार ते पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे, आदिती तटकरे, छगन भुजबळ, संजय बनसोडे, नरहळी झिरवळ यांचा समावेश असल्याची शक्यता आहे.

शिवसेनेमध्ये कोणाला मिळणार मंत्रि‍पदे?

शिवसेनेकडून ५ ते सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

भाजपकडून कोण कोणते नेते मंत्रि‍पदाची शपथ घेणार?

भाजपकडून सर्वाधिक १० मंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांचा समावेश असू शकतो. त्याशिवाय मेघना बोर्डीकर, जयकुमार रावल, राणा जगजीतसिंह पाटील, राहुल ढिकले, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे आणि गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close