क्राइम

मित्राची मित्राच्या पत्नीवर होती नजर त्याची मित्राला झाली खबर आणि …..

Spread the love

गुवाहाटी  / नवप्रहार मीडिया 

मित्र म्हटला की त्याच्या जवळ मनातलं सगळं बोलून जाणे त्याला आपल्या सुख दुःखात सहभागी करून घेणे हे नेहमीचंच. आता मित्र म्हटल्यावर त्याचे घरी येणेंजाने हा काही नवीन प्रकार नाही. पण याच गोष्टीचा कोणी फायदा उचलत असेल आणि मित्राच्या पत्नीलाच जर पळवून नेट असेल तर मग मित्राला राग येणे स्वाभाविक आहे. आणि याच रागात मित्राने मित्राचा खून केल्याची घटना गुवाहटीच्या कलाईगवात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघंही बालमित्र होते. अचानक एके दिवशी सद्दाम हुसेनची त्याच्याच मित्रानं हत्या केली. या दोघांमध्ये असं काय घडलं की प्रकरण हत्येपर्यंत पोहोचलं, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे.मृत सद्दाम हुसेनचे त्याच्या मित्राच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचं पोलीस तपासादरम्यान स्पष्ट झालं. हे प्रेम एकतर्फी नव्हतं. मित्राची पत्नीदेखील सद्दामच्या प्रेमात पडली होती. दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. एके दिवशी सद्दाम त्याच्या मित्राच्या घरी गेला आणि त्याच्या पत्नीची आपल्यासोबत पळून येण्यासाठी मानसिक तयारी केली. त्यानंतर हे दोघं पळून गेले.

सद्दामने त्याच्या मित्राच्या पत्नीला पळवून नेल्यानंतर इकडे त्याचा मित्र आपल्या पत्नीचा शोध घेत होता. त्या वेळी सद्दामने आपल्या पत्नीला पळवून नेल्याचं त्याला समजलं. यावरून नाराज झालेल्या बापन देबनाथने सद्दामची गोळ्या झाडून हत्या केली. सद्दाम हुसेन कलाईगावमधल्या अमगुरीत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. त्याचा मित्र बापन प्लंबिंगचं काम करतो. पाच मार्चला सायंकाळी चार वाजता बापनने सद्दामची गोळ्या झाडून हत्या केली. घटनेनंतर सद्दामला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं; पण उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटना घडण्याच्या 11 दिवस आधी सद्दाम त्याच्या मित्राच्या पत्नीला सोबत घेऊन पळून गेला होता. अर्थातच यामागे प्रेमसंबंध हे कारण होतं.

गुवाहाटीचे पोलीस उपायुक्त (पूर्व) मृणाल डेका यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं, की पीडित आणि हल्लेखोर हे एकमेकांना ओळखत होते. घटनेपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. पीडित व्यक्तीला तातडीने शहरातल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी बापनला अटक केली. बापनकडे पिस्तुल कसं आलं याचा सखोल तपास पोलीस सध्या करत आहेत. पोलीस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातल्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. प्रेमसंबंधातून सद्दामची हत्या झाल्याचं उघडकीस येताच या घटनेची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तपासादरम्यान आणखी काही कारणं समोर येऊ शकतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close