हटके

मित्रानेच कापला मित्राचा प्रायव्हेट पार्ट

Spread the love

केंद्रपाडा (उडीसा) / नवप्रहार डेस्क

                एका जिवलग मित्राने दुसऱ्या मित्राचा तो गाढ झोपेत असतांना प्रायव्हेट पार्ट कापल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे ते दोघे बीचवर सोबत फिरायला गेले होते.तेथे त्यांनी जेवण केले आणि एन्जॉय केला. त्यांनतर असे काय घडले की मित्राने जिवलग मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला. घटना राजनगर भागातील आहे. सध्या तरूणाची गंभीर स्थिती पाहून त्याला कटकच्या एससीबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बालीपटना येथील भागवत दास आणि त्याचा मित्र अक्षय रविवारी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पेंठा येथील बीचवर गेले. अक्षयनेच भागवतला सोबत चलण्यास सांगितलं होतं.

दोघांनी बीचवर बराच वेळ सोबत घालवला. नंतर जेवण करून दोघेही तिथेच लेटले. जसा भागवत झोपला, तेव्हाच अक्षयने धारदार हत्याराने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याला गंभीर जखमी केलं.

त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं. पण अक्षयने आपल्या मित्राला त्याच स्थितीत सोडलं आणि तो फरार झाला. भागवतने कसातरी आपल्या कुटुंबियांना फोन केला. ते तिथे पोहोचले तेव्हा भागवत बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं.

भागवतला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी त्याला कटकच्या एससीबी हॉस्पिटलमध्ये रेफर केलं. भागवतच्या काकाने आरोपी अक्षय विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस अक्षयचा शोध घेत असून हे जाणून घेतलं जात आहे की, अक्षयने आपल्या मित्रासोबत असं का केलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close