क्राइम

मित्राच्या पत्नीचा जेवण देण्यास नकार ,मित्राने केले असे कृत्य 

Spread the love
           
बदलापूर /प्रतिनिधी 
      शाळेतील अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणात चर्चेत असलेल्या बदलापूर येथून आणखी एक घटना उदयास आली आहे.   मित्राच्या पत्नीने जेवण देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने त्यांच्या साडेचार वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला जेरबंद करत मुलीची  छिंदवाड़ा येथून सुटका केली आहे.
 या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १७ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला असून नराधम आरोपीला गजाआड केलं आहे. आरोपीला छिंदवाडा येथील अटक करण्यात आली आहे.
रणजीत धुर्वे असं अटक केलेल्या २५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. ते एका इमारतीच्या बांधकामस्थळी मजूर म्हणून काम करतो. घटनेच्या दिवशी मंगळवारी तो आपला मित्र सवादच्या घरी गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने मित्राच्या पत्नीकडे जेवण मागितलं. पण मित्राच्या पत्नीने जेवण देण्यास नकार दिला. हा राग मनात घरून आरोपी धुर्वे यानं पीडित दाम्पत्याच्या साडेचार वर्षांच्या मुलींचं अपहरण केलं.

आरोपी पीडित मुलीला घेऊन थेट मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं गेला होता. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट ४ ने मोठी कारवाई केली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. यावेळी आरोपी बुधवारी संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकावरून गोरखपूर मेलमध्ये चढल्याचं दिसलं. यानंतर पोलिसांनी छिंदवाडा पोलिसांशी संपर्क साधून धुर्वेला अटक केली. तसेच अपहरण झालेल्या चिमुकल्या मुलीची सुटका केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close