राजकिय

मिटकरी यांच्या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Spread the love

मुंबई  / नवप्रहार मीडिया 

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा दिवसागणिक गंभीर विषय होत चालला आहे. जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अश्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठा समाजात सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं. मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन अमोल मिटकरींनी केलंय.

ओबीसीमध्ये असलेल्या मराठा कुणबी समाजानं मोठं मन करावं, असं अमोल मिटकरी म्हणालेत. अशातच अमोल मिटकरींच्या या नव्या भूमिकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे महाराष्ट्र वातावरण पेटलेल आहे. मागील नऊ-दहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग अजूनही कमी होण्यास तयार नाही. सरकार वेळ वाढवून मागत आहे तर आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

कुठं अन्न पाण्याशिवाय सुरु असलेलं आमरण उपोषण, कुठं रास्ता रोको तर कुठं जाळपोळ सुरू आहे. मागच्या जवळपास दहा दिवसापासून सुरु असलेल्या मराठा आंदोलनाची धग अजूनही कायम आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close