मालकिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले ; पाच कोटी घेतले आणि पसार झाला
अहमदाबाद / नवप्रहार डेस्क
आयटी कंपनीची मालकीण असलेल्या महिलेला तेथीलच कर्मचाऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.नंतर तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिला आर्थिक अडचण सांगितली. महिलेने आपली आयटी कंपनी गहाण ठेऊन त्याला 5 कोटी रुपये दिले. पण त्यानंतर तो पसार झाला. महिलेने पोलिसात तक्रार दिली. पण पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने वैतागलेल्या महिलेने ठाण्यातच फिनाईल प्राशन केले. या प्रकाराने घाबरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहिती नुसार गुजरातमधील या महिलेने ओडिशामधील भद्रक जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तक्रारीनंतर काहीच कारवाई न केल्याने वैतागलेल्या सदर महिलेने पोलील ठाण्यामध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पीडित महिला अहमदाबादमधील एका आयटी कंपनीची मालकीण होती. ती तिच्या कंपनीत काम करत असलेल्या मनोज नायक नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचाही एक दोन वर्षांचा मुलगाही आहे. दरम्यान, मनोज याने विवाह केल्यानंतर आपल्या गावात एक व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनीची मालकीण असलेल्या पत्नीला राजी केले. त्यानंतर या महिलेने कंपनी आणि संपत्ती गहाण ठेवत सुमारे ५ कोटी रुपये मनोज ला दिले.
मात्र हे पाच कोटी रुपये घेतल्यानंतर मनोज या महिलेला सोडून फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र तीन महिले लोटले तरी पोलिसांना काही माहिती मिळू शकली नाही. तक्रारीनंतरही फारसा तपास न झाल्याने त्रस्त झालेल्या बोनठ पोलीस ठाण्यात जाऊन फिनाईलचं सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून पोलीस कर्मचारीही हादरले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता उपचारांनंतर या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
महिलेच्या भावाने सांगितले की, माझी बहीण मागच्या तीन महिन्यांपासून त्रस्त आहे. तसेच पोलिसांच्या बेफिकीरीमुळे तिनं आज टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप त्याने केला.