क्राइम

बेपत्ता तरुणी सापडली अश्या अवस्थेत की ….

Spread the love

छत्रपती संभाजीनगर  / नवप्रहार डेस्क

                  दरवषी  हजारो महिला आणि तरूणी बेपत्ता होतात. पोलिसात तक्रार करून देखील त्यांचा शोध लागत नाही. कुटुंबीय काही दिवस तिचा शोध घेतात. पण त्याच्या काहीच फायदा होत नसल्याचे पाहून दमून थकून ते देखील गप्प बसतात. पण बेपत्ता झालेल्या महिला आणि तरूणी मध्ये एखादी तरूणी किंवा महिला नशीबवान असते. जिला अनेक यातना सहन केल्यावर का होईना पण कुटुंबीय मिळतात. रागाने घरून निघालेली मुलगी मध्यप्रदेश मध्ये सापडली आहे. ती ज्या स्थितीत सापडली त्यावरून महिला आणि तरूणी बेपत्ता होण्यामागे मानव तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.

संभाजीनगरच्या 18 वर्षीय मुलीचे नशीब बलवत्तर ठरले आहे. माजी माझी खासदार इम्तियाज जलील यांनी या मुलीला मध्यप्रदेश मधून 24 तासात सोडवून आणले आहे. मात्र, तिला सहा महिने नरकयातना सोसाव्या लागल्या आहेत.

पीडित मुलीचे घरात भांडण झाले म्हणून ती संभाजीनगरहुन परभणीला नातेवाईकांकडे रागारागात निघाली. रेल्वे स्टेशनवर तिला एका जोडप्याने प्यायला पाणी दिले. नंतर या मुलीला काही समजले नाही. ती उठली तेव्हा मुंबईमध्ये होती. नंतर तिथून तिला मध्य प्रदेशमध्ये नेण्यात आले. मध्यप्रदेश मधील या भागात अनेक मुली अजूनही आहेत. या हजारो मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले गेले असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. या टोळीला मध्यप्रदेश पोलीसांचा सहभाग असल्याचा आरोपसुद्धा जलील यांनी यावेळी केला.

या मुलीची माहिती मिळताच तिला सोडवण्यासाठी जलील यांनी आपले कार्यकर्ते मध्यप्रदेशात पाठवले. कार्यकर्ते त्या गावात जाताच गावकऱ्यांनी हल्ला करायची तयारी केली. मात्र, मुलीनेच तक्रार केली. तिला दीड लाखात खरेदी करून तिचा जबरीने विवाह लावण्यात आला होता. सुदैवाने या मुलीची माहिती मिळाली आणि तिची सुटका करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रातून वर्षभरात 6 हजार महिला मुली बेपत्ता आहेत. या सर्व मुलींना शोधून त्यांना परत आणण्यासाठी सरकारने पाऊल उचलणे गरजेचे आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close