भविष्यात मुंबई येऊ शकते पाण्याखाली
मुंबई पाहण्यासाठी घ्यावी लागणार स्कुबा ड्रायव्हिंग ची मदत
मुंबई / नवप्रहार डेस्क
मागील अनेक वर्षांपासून वैज्ञानिक मानवाला ग्लोबल वॉर्मिग पासून सतर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण मानव जात पर्यावरण संतुलनाला घेऊन पाहिजे तशी जागरूकता पाहायला मिळत नाही. तसेच मानवाचे समुद्रावरील अतिक्रमण वाढत असल्याने भविष्यात त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळणार . आणि येणाऱ्या काळात भारतातील मुंबई, चेन्नई याठिकाणी शहरांना समुद्र गिळंकृत करेल. त्यामुळे ही शहरे पाण्याखाली येतील.
येत्या 16 वर्षांत मुंबईतील 13 टक्के म्हणजेच 830 चौरस किलोमीटर क्षेत्र समुद्राखाली बुडेल. शतकाच्या अखेरीस जलमय झालेल्या क्षेत्राचे प्रमाण 1377.12 चौरस किलोमीटरपर्यंत वाढेल. 2150 पर्यंत मुंबई पाण्यात नाहीशी होईल. प्राचीन द्वारकेप्रमाणे हे शहर देखील पाण्याखाली जाईल. त्याला पाहण्यासाठी पारदर्शक पाणबुडी किंवा स्कूबा डायव्हिंगची मदत घ्यावी लागेल, अशा बातम्या काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. ही स्थिती टाळण्यासाठी नासासारख्या संस्था शक्य ते प्रयत्न करत आहेत.
समुद्राची वाढती पाणी पातळी मोजण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी खास रोबो तयार केले आहेत. हे रोबो पाण्याखाली तैनात केले जात आहेत. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने ‘IceNode’ नावाचा एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे. या मोहिमेत नासातील शास्त्रज्ञ अंटार्क्टिकाच्या बर्फाळ थराखालील समुद्रात ऑटोनॉमस अंडरवॉटर रोबो सोडत आहेत. हे रोबो अंटार्क्टिकातील समुद्राचा अभ्यास करतील.
या वर्षी मार्च महिन्यामध्ये, नासातील शास्त्रज्ञांनी अलास्काच्या ब्युफोर्ट समुद्रात बर्फाच्या जाड पृष्ठभागाच्या 100 फूट खाली सिलिंडरसारखा रोबो तैनात केला होता. अंटार्क्टिकामध्ये असे अनेक रोबोट लावण्याची तयारी सुरू आहे. हे सर्व रोबो बर्फाच्या जाड थराखालील बर्फ वितळणे आणि दीर्घ कालावधीत समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याविषयी माहिती गोळा करतील.
अंटार्क्टिका हा असा खंड आहे जिथे फार कमी लोकांचा वावर आहे. या खंडाचं आरोग्य बिघडल्यास संपूर्ण जग हादरून जाईल. तेथीच ऋतू बदल संपूर्ण जगावर परिणाम करतात. त्यामुळे तिथे अशी उपकरणं बसवणं गरजेचं आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यातील आपत्तींची सविस्तर माहिती मिळू शकेल.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, अंटार्क्टिकातील संपूर्ण बर्फ वितळला तर जगातील जवळपास सर्व समुद्रांची पाण्याची पातळी 200 फुटांनी वाढेल. अशावेळी भारतातील अनेक किनारी राज्यांचा मोठा भाग पाण्याखाली जाईल. जगाच्या नकाशावरून अनेक बेटं नाहीशी होतील. समुद्र पाहण्यासाठी आपल्याला मुंबई किंवा चेन्नईसारख्या ठिकाणी जावं लागणार नाही. समुद्राची पाणी पातळी वाढल्यास पुणे आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्येच समुद्र बघता येईल. जसजशी उष्णता वाढत आहे तसतसं ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. हिमनद्या आणि अंटार्क्टिकातील बर्फ वेगाने वितळत आहेत.