सुमित वानखेडेंनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली घडले मिर्झापूर नेरी – बाळा सोनटक्के
“सुमित वानखेडेंनी गावाच्या एकीतून गाव घडविण्यासाठी दिलेली शिकवण फळाला” – नेरी ग्रामवासियांचे मनोगत
मिर्झापूर नेरी गावाला शासनाचा माझी वसुंधरा अभियानाचा राज्य पुरस्कार 50 लाख रुपये जाहीर
आर्वी / प्रतिनिधी
” सुमित वानखेडेंच्या मार्गदर्शनाखाली आमचे मिर्झापूर नेरी हे नाव घडले असुन त्यांच्याच मार्गदर्शनाने आमचे गाव आदर्श गाव घडले आहे. गावाला एकीचा मार्ग दाखवत विकास घडवून दाखवला. मिर्झापूर नेरी आदर्श गाव घडण्या मागे सुमित वानखेडे हेच मोठा हात आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच आम्हाला हा टप्पा गाठता आला. ” असे प्रतिपादन बाळा सोनटक्के यांनी मिळालेल्या पुरस्कार बद्दल अधिक माहिती देतांना सांगितले.
ग्राम पंचायत मिर्झापुर नेरी ला माझी वसुंधरा अभियानाचा राज्य स्तरीय 50 लाखाचा पुरस्कार मिळाला. ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ग्राम पंचायत मिर्झापुर सतत 3 वर्षा पासून सहभाग घेत असून निसर्गाच्या संवर्धनासाठी काम करित आहे, सण 2023-24 मध्ये ग्राम पंचायत मिर्झापुर ने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्व पंच तत्वावर काम करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी भूमी, अग्नी, वायू, आकाश आणि जल या पाच ही बाबीवर विविध प्रकारच्या योजनेचा आधार घेऊन, लोक सहभाग घेऊन, श्रमदानातून विविध प्रकारच्या उपाय योजना केल्या व माझी वसुंधरा अभियानातील सर्व उद्दिष्टे दिलेल्या कालावधीत पूर्ण केले.
परिक्षणा दरम्यान केलेल्या कार्याबद्दल परीक्षकांनी समाधान व्यक्त केले, मिर्झापुर नेरी हे पुनर्वसित गाव असून या गावाची लोकसंख्या 425 आहे, या गावात 100%, शौचालय, 100% घरगुती नळ, 100% वैयक्तिक शोषखड्डे, 100% कुटुंबाकडे गॅस सिलेंडर, 100% कुटुंबा कडे वीज जोडणी व 100% कुंटुंबानी सौर ऊर्जा प्रकल्प नोंदणी, 100% कुंटुंबाकडे स्वच्छता कचरा पेटी, 100% कुटुंबातील सर्व महिला महिला बचत गटात सहभागी, गावातील सर्व तरुण मुले 100% ग्राम उत्सव समिती व क्रीडा गटात सहभागी, गावातील सर्व चौकात सार्वजनिक कचरा पेटी, गावातील सर्व चौकात माझी वसुंधरा अभियान लोगो व बसण्यासाठी व चर्चा करण्यासाठी ओटा, गावातील सर्व रस्त्यांचे डांबरी करण झाले आहेत, गावातील सर्व शासकीय कार्यलय, ग्राम पंचायत, शाळा अंगणवाडी ,शुद्ध पाणी प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्पा ला जोडले आहेत, गावातील 100%स्ट्रीट लाईट L E D लाईट मध्ये रूपांतर केले आहे. गावात शुद्ध व थंड पाण्यासाठी जिल्ह्यातील एकमेव अल्कलाईन युक्त 2017 पासून निरंतर चालू असलेला व पाण्याच्या ATM सॊबत जोडलेला शुद्ध पाणी प्रकल्प आहे. गावात कचरा विलगीकरन शेड व कचरा वाहतुकी करीता कचरा गाडी व स्वछता गृह, स्वच्छता कामगारांची नियुक्ती, गावात व परिसरातील सार्वजनिक जागेत म गा रा रो हमी योजनेत 3800 वृक्षांची लागवड केली आहे. गावातील 100% कुटुंब रोजगार हमी नोंदणी कृत आहेत, गावातील सर्व शासकीय, अशासकीय कार्यात गावातील ग्राम उत्सव समिती सक्रिय सहभाग नोंदविला.
गावातील सर्व महिला बचतगट उद्योगशिल असून गावात उद्योग भवन बांधकाम झाले आहे. शाळकरी मुले व अंगणवाडी मुलांचे करिता सेंद्रिय परसबाग बांधकाम करण्यात आली आहे या गावाने आता पर्यंत अनेक राज्य स्तरीय, विभागस्तरीय, जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला असून या ग्राम पंचायत ला खालील प्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत
1 ) सत्यमेव जयते वॉटर कप पुरस्कार – 7लक्ष 50 हजार
2) राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियान पुरस्कार – 5 लक्ष
3) आर आर पाटील स्वछ व सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) पुरस्कार -40 लक्ष
4) मिशन समृद्धी पुरस्कार -10000
5) स्वछ व सुंदर शाळा पुरस्कार
तसेच या गावाचे सरपंच बाळा भाऊ सोनटक्के यांना अनेक वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले असून सचिव राजेश शेंदरे यांनां अनेक पुरस्कार मिळाले असून विभागातुन आदर्श व गुणवंत ग्राम पंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सन 2017 मध्ये मा मुख्यमंत्री देवेन्द्र जी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक श्री सुमित भाऊ वानखडे यांचे मार्गदर्शन व प्रेरणेने सादर गाव विकासाचे अनेक टप्पे पार करीत आहे.
2024-25 मध्ये या गावाने महावितरण कंपनी कडे 100% गाव सोलार आधारित करन्यासाठी नोंदणी केली आहे. असे एक नव्हे तर अनेक बाबीवर गावाने विकासाचा पल्ला गटाला असून या ग्राम पंचायत ला आता पर्यंत विविध ग्राम पंचायत चे 428 सरपंच, सदस्यनी गाव पाहिनी करता भेटी दिल्या आहेत. 100% भूमिहीन झालेले, प्रकल्प ग्रस्त असलेले ह्या गावने विकासाचा पल्ला गाठला आहे आणि हा टप्पा गाठणे सुमित वानखेडे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन उपयोगी पडेल आहे अशी भावना मिर्झापूर नेरी वासियांनी वक्त केली आहे.या वेळी गावकऱ्यांची प्रचंड गर्दी. होती