क्राइम

इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

Spread the love

घटनेचे फोटो काढून ब्लॅकमेलिंग 

पुणे / नवप्रहार डेस्क 

            बंडगार्डन पोलीस स्टेशनं च्या हद्दीत संतापजनक घटना घडली आहे. २१वर्षीय तरुणाने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. घटनेचे फोटो  काढून  ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिचे शारीरिक शोषण केले.प्रसाद नितीन खंडाळे (वय २१, रा. ताडीवाला रोड) असे आरोपीचे नाव आहे. नराधमाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ फेब्रुवारी २०२१ ते २३ आॅक्टोबर २०२३ दरम्यान घडला

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षाच्या मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्या दंडात कोणते तरी इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. तिच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. शारीरीक संबंध  प्रस्थापित करत असताना तिचे न कळत फोटो काढले. ही घटना कोणाला सांगितल्यास व आरोपी बोलवेल तेथे भेटण्यास न गेल्यास काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

 

 

 

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close