क्राइम

महाराजाचे आश्रमातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार 

Spread the love

कन्नड / नवप्रहार प्रतिनिधी

                सध्या देशातील अनेक भागातून महिलांवरील अत्याचारात कमालीची वाढ़ झाल्याचे पहायला मिळत आहे. शाळेतील चिमूरड्या मुली देखील यापासून सुटल्या नाहीत.कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील जैतापूर रोडवरील माऊली कन्या आश्रमात मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दादासाहेब पुंडलीक अकोलकर ( 68) असे आरोपी महाराजाचे नाव आहे.

अकोलकर हा गेल्या 10 वर्षांपासून हतनूर शिवारातील जैतापूर रोड वरील गट क्रमांक 131 मध्ये माऊली वारकरी शिक्षण कन्या आश्रम चालवतो.

धार्मिक शिक्षणाच्या उद्देशाने जिल्ह्यासह अनेक भागातून या वारकरी शिक्षण कन्या आश्रमात 10 ते 17 वर्ष वयाच्या सुमारे 16 ते 18 मुली वास्तव्यास आहे. दररोज दादासाहेब अकोलकर हा महाराज या मुलींना गीतापाठ, सांयकाळी हरीपाठ, टाळ, मृंदग वाजवणे आदी प्रशिक्षण देत होता. मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी रात्री या महाराजाने आश्रमातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मध्यरात्री त्याच्या खोलीमध्ये बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. एवढ्यावर न थांबता नराधम महाराजाने दुसर्‍या मुलीसोबतही अत्याचार केला. ही गोष्ट कुणाला सांगितली कर तुम्हाला काढून टाकीन, अशी धमकी अकोलकर महाराजाने दिल्याने पीडिता घाबरून राहिल्या. त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने या मुलींनी शाळेतील शिक्षकांच्या फोनवरून ही बाब शुक्रवारी पालकांना सांगितली. यानंतर पालकांनी कन्नड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदिर पटेल, बीट जमादार कैलास करवंदे, संजय आटोळे, संदीप कनकुटे, अमोल गायकवाड, मोनिका बाविस्कर, रेखा चव्हाण, सुकेशिनी कांबळे आदींनी भेट दिली आहे. आरोपी महाराज दादासाहेब अकोलकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. या महाराजाने इतर मुलींवरही अत्याचार केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कन्नड ग्रामिण पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपवभागिय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहे.

बदलापूरच्या घटनेनंतर मुलींनी हिम्मत केली
राज्यभरात बदलापूर येथील आदर्श शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आली. यानंतर अनेक ठिकाणच्या घटनांना वाचा फुटली असून, त्यामुळे या अल्पवयीन मुलींनी हिम्मत केल्याचे बोलले जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close