धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली मौलवी कडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

या घटनेचा व्हिडिओ बनवून वारंवार बलात्कार
जादूटोणा करून मुलीसह घरच्यांना संपवण्याची देत होता धमकी
कानपुर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
घरात मदरसा चालविणाऱ्या मौलवी कडून धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलीला बायको घरी नसल्याने स्वयंपाक करण्याचा नावावर बोलावून तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याच्या नावावर वारंवार तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केलेल्या तक्रारीत केला आहे. या घटनेची वाच्यता केल्यास तुला आणि कुटुंबाला जादूटोण्याने ठार करेल अशी धमकी तो पीडितेला देत होता.मौलवी कारी मोहम्मद अहमद असे त्याचे नाव आहे.
हे प्रकरण कानपूरच्या बिथूर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. मौलवी कारी मोहम्मद अहमद अनेक दिवसांपासून आपल्या घरात मदरसा चालवत होता. आजूबाजूची मुले येथे धार्मिक शिक्षणासाठी येत. अल्पवयीन पीडिताही त्याच्या मदरशात जात असे. मौलवीच्या अश्लीलतेला आणि विनयभंगाला कंटाळून तिने २०१८ मध्येच मदरशात जाणे बंद केले. मात्र मौलवी पीडित तरुणीला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने बोलावून अश्लील कृत्य करायचा.
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, २२ जानेवारी रोजी मौलवीने पत्नी आजारी असल्याच्या बहाण्याने पीडितेला घरी जेवण बनवण्यासाठी बोलावले. यादरम्यान त्याने पीडितेला अंमली पदार्थ पाजले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर मोहम्मद अहमदने मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या बहाण्याने मौलवी अनेकदा पीडितेला ब्लॅकमेल करू लागला. १७ मे रोजी पुन्हा एकदा मौलवींनी मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. अखेर या छळाला कंटाळून पीडितेने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला.
हा मौलवी स्वत:ला जादूटोण्यात निपुण म्हणवून घेत असे, असा आरोप पीडितेने केला आहे. जेव्हा जेव्हा ती मौलवीच्या कृतीला विरोध करत असे तेव्हा तो तिला आणि तिच्या कुटुंबाला जादूटोणा करण्याच्या धमक्या देत असे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते मौलवीला घाबरतात. पोलिसांनी २७ जून मौलवी कारी मोहम्मद अहमदला अटक केली. आरोपींवर आयपीसीसह पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. मौलवीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.