Uncategorized

मंत्र्याच्या कार्यालयात असलेल्या पोलिसाकडून इसमाचे अपहरण करत खंडणी उकळल्याचा प्रकार समोर

Spread the love

मुंबई /विशेष प्रतिनिधी

                      शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या पोलिसांने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका पान टपरी वाल्याचे अपहरण करून त्यांच्या कडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्यावर दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तर दोघांची चौकशी सुरू आहे.

अंधेरी पश्चिमेकडील एस.व्ही. रोडवर अकबर शेख याची पान टपरी असून ती मोहम्मद अरीफ खान हा चालवतो. गेल्या आङ्गवडय़ात आर्टिगा कार त्या पान टपरीसमोर येऊन उभी राहिली. त्यातून दोघे उतरले आणि त्यांनी स्वतःची ओळख ‘फूड डिपार्टमेंटचे पोलीस’ अशी करून दिली. तू गुटखा विकतोस असे सांगत दोघांनी आरीफला कारमध्ये बसवले आणि ते त्याला घेऊन गेले. कारमध्ये आरीफ वगळता अन्य चार जण होते. कार सुरू झाल्यावर त्यातील दोघांनी आरीफकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. मित्राकडे 30 हजार रुपये मागून आरीफने स्वतःकडील 10 हजार असे मिळून त्यांना ऑनलाईन 40 हजार रुपये दिले. इतक्यावरच अपहरणकर्ते थांबले नाहीत तर त्यांनी आरीफच्या खिशातील साडेतीन हजार रुपयेदेखील काढून घेतले. मग त्याला जाऊ दिले. दरम्यान, घरी गेल्यावर आरीफने हा प्रकार मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनी डी.एन. नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला असता त्यात चंद्रशेखर दराडे, हेमंत कापसे या दोघा पोलिसांसह सागर वाघ आणि नितीन गाढवे अशा चौघांना पकडले. वाघ हा महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान आहे. या चौघांनी संगनमत करून आरीफ या पान टपरीवाल्याचे अपहरण केले.

दोघांवर निलंबनाची कारवाई

चंद्रशेखर दराडे व हेमंत कापसे या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे वरिष्ठ अधिकाऱयाकडून सांगण्यात आले. दराडे आणि कापसे हे सशस्त्र पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. तेथून दराडे प्रतिनियुक्तीवर संरक्षण व सुरक्षा विभागात गेला. त्याची नेमणूक दादा भुसे यांच्या कार्यालयात ऑपरेटर म्हणून करण्यात आली होती. तर कापसे हा मोटर परिवहन विभागात प्रतिनियुक्तीवर होता.

एनडीपीएसच्या गुह्यात अडकविण्याची धमकी

अपहरण केल्यानंतर चौघांनी आरीफकडे खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास एनडीपीएसच्या गुह्यात अडकवू अशी धमकी आरोपींनी आरीफला दिली होतn

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close