
घाटंजी तालुका प्रतिनीधी / सचिन कर्णेवार घाटंजी
घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील सुधाकर शामरावजी खंडाळकर यांचा भारतीय लाख अनुसंधान संस्थान झारखंड अंतर्गत राज्याचे कृषिमंत्री श्री बादल, खासदार राजेश कश्यप,आयसीआर संस्थेचे संचालक अभिजित, निर्मल कुमार , वनविभाग पांढरकवडा येथील डी एफ ओ गुरूप्रसाद, झारखंड विद्यापीठाचे कुलपती यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सुधाकर खंडाळकर यांना सन्मानित करण्यात आले. लाखेचे उत्पादन मध्यप्रदेश झारखंड, छत्तीसगड,ओरिसा,नेपाळ, उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश,या सह भारतात सुध्दा मोठ्या प्रमाणात घेतले जाते. लाख पासून बनवलेल्या वस्तूंची जगात मोठी मागणी आहे. लाख उत्पादनाचा दिडसे प्रोडक्ट मध्ये वापर केल्या जातो. एकीकडे यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे.निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाला न मिळणारे भाव व पारंपारिक शेती तोट्यात आल्यामुळे शेतकरी नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे.परंतु लाख शेतीच्या माध्यमातून नवीन प्रयोग करणारे सुधाकर खंडाळकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरलेले आहेत. ते एवढ्यावरच न थांबता रांची येथे प्रशिक्षण घेऊन महिला बचत गट, शेतकरी गट,लाख पोषक करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनात भर घालत आहे. लाख शेती ही पळस व या झाडावर केली जाते विदर्भातील खास करून यवतमाळ जिल्ह्यात लाख शेतीचे उत्पादन घेतल्या जाते. रंगिली कुशमी, रंगिनी या प्रजातीच्या लाखेचे उत्पादन आपल्या घेतले जाते. सुधाकर खंडाळकर यांनी लाख प्रशिक्षण घेऊन स्वतः उत्पादन तर घेतलेच परंतु आपल्या गावासोबत विदर्भातील अमरावती,भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली,या भागात ते शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जातात. त्यांच्या लाख शेतीला वनविभागाचे सि.सि.एफ,देवेंद्र कुमार,डि एफ ओ डोळे, जिल्हाधिकारी यडमे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,यांनी भेटी दिलेल्या आहेत. सुधाकर खंडाळकर यांचा रांची येथे झालेला सत्कार अभिमानास्पद असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी असाच आहे. या सत्काराने परिसरात कौतुक होत आहे.