तरुणाच्या त्या कृत्यामुळे प्रवासी आणि पोलिसांना झाला मनस्ताप

कल्याण / प्रतिनिधी
सध्या महागडे मोबाईल वापरण्याची फॅशन झाली आहे. बाजारात असलेल्या आयफोन खरेदी करण्यासाठीं तरुण वाट्टेल ते करायला. तयार असतात. पण हल्ली मोबाईल चोरीच्या घटनेत देखील प्रचंड वाढ झाली आहे. बस ने बायकोसह सासरवाडी साठी निघालेल्या तरुणाचा मोबाईल चोरी गेल्याने त्याने असे कृत्य केले की बस मधील प्रवासी आणि पोलिसांना नाहक त्रास आणि मनस्ताप सोसावा लागला.
एका तरुणाचा महागडा मोबाईल बसमध्ये चोरीला गेला. त्यानंतर त्याने थेट रस्त्याच्या मध्येच बस थांबवून प्रवाशांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. तसेच वाहतूक कोंडी वाढल्याने अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
संतोष साळवे असे मोबाईल चोरीला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष आपल्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी जात होते. त्यांनी आपल्या पत्नीसह कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरातून बस पकडली. मात्र काही वेळातच त्यांच्या खिशातला तब्बल दीड लाख रुपये किमतीचा महागडा मोबाईल गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मोबाईल चोरीला गेल्याचे समजताच संतोष साळवेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने कोणतीही तमा न बाळगता रस्त्याच्या मधोमध बस थांबवली. यानंतर त्याने प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि खिसे तपासण्यास सुरुवात केली.
यावेळी बसमध्ये प्रवासी खच्चून भरले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. कोणताही वाद नये म्हणून अनेक प्रवासी एक एक करून आपली बॅग आणि खिसे तपासणीसाठी देत होते. खाली उतरत होते. या अजब प्रकारामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
पोलिसांना मोठा मनस्ताप
या सर्व गोंधळामुळे कल्याण रोडवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडीची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने संतोष साळवे याला थांबवले. “तू मोबाईल शोधतोय. मोबाईल मिळाला का? लोकांना हैराण करतोय. तुझी काय तक्रार असेल तर पोलिस ठाण्यात कर. आम्ही शोध घेऊ.” असे पोलिसांनी संतोष याला सांगितले.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर संतोष साळवे याने तपासणी थांबवली. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, संतोष साळवे याच्या या कृत्यामुळे बसमधील प्रवासी, बस चालक, वाहक आणि वाहतूक पोलिसांना मोठा मनस्ताप झाला. एकीकडे संतोष साळवेच्या मोबाईल चोरीची घटना चर्चेत असताना दुसरीकडे कल्याण पश्चिम येथील खडकपाडा पोलिसांनी केलेल्या एका उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत चोरीला गेलेले सुमारे साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे २५ मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांना परत केले आहेत.
एका तरुणाचा महागडा मोबाईल बसमध्ये चोरीला गेला. त्यानंतर त्याने थेट रस्त्याच्या मध्येच बस थांबवून प्रवाशांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला. तसेच वाहतूक कोंडी वाढल्याने अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.