हटके

प्रवाश्यांचा हवेत जीव टांगणीला लागला ? पायलट चा बाथरूम मध्ये मृत्यू 

Spread the love

              जीव टांगणीला लागला हा शब्दप्रयोग आपण ऐकला असेल एखादया गोष्टीची आपणाला जेव्हा जास्त चिंता लागते तेव्हा हा वाक्य प्रयोग केला जातो. पण हवेत जीव टांगणीला लागला असे जर कोणी म्हटले तर काय तरीच काय ? असा तुमचा रिप्लाय असेल . परंतु या म्हणीप्रमाणे एक घटना घडली आहे. मियामीहून चिलीला जाणाऱ्या व्यावसायिक विमानाच्या पायलटचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला.पायलट बाथरूममध्ये पडल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानाचे पनामामध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

या विमानात 271 प्रवाशी होते. न्यूज वेबसाईट द सनने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री घडली. LATAM एअरलाइन्सच्या फ्लाइटचा कमांडर इव्हान आंदौर याचा मृत्यू झाला आहे. अंदाजे 11 वाजता पायलटचा हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

विमान लँडिंग करत असताना इसाडोरा नावाची एक नर्स प्रवाशांमधील दोन डॉक्टरांसह, वैमानिकाच्या मदतीसाठी धावली. मात्र अनेक प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. विमान पनामा सिटीमध्ये उतरल्यानंतर पायलटला मृत घोषित करण्यात आले.

विमानाच्या सह-वैमानिकांनी पनामा शहरातील टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले होते.  एका प्रवाशाने सांगितले की, फ्लाइट टेकऑफ झाल्यानंतर सुमारे 40 मिनिटांनंतर सहवैमानिकाने फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टरांना मदतीचे आवाहन केले. दुसरीकडे आंदौरची प्रकृती बिघडली असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी विमानाने पुन्हा उड्डाण करण्यापूर्वी पनामा शहरातील हॉटेल्समध्ये एकूण 271 प्रवाशांची सोय करण्यात आली होती. दरम्यान, LATAM एअरलाइन्सने एक निवेदन जारी केले. ते म्हणाले ही खूप दुःखद घटना आहे. लँडिंग झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत असूनही, इव्हान अंदौरला वाचवता आले नाही.  लॅटम ग्रुपने या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे आणि पायलटच्या शोकाकुल कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close