एम.एच.२९ हेल्पिंग हॅण्ड टीमने वाचवला भला मोठा अजगर; निसर्गाच्या सान्निध्यात सोडले
यवतमाळ,/ प्रतिनिधी
आज दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास यवतमाळ जवळील कापरा गावात अल्ताफ लुचे यांच्या शेतात एक भला मोठा अजगर असल्याचे निदर्शनास आले.याची माहिती गावकऱ्यांनी वरिष्ठ सर्पमित्र अजय वर्मा आणि निलेश मेश्राम यांना दिली.त्यांनी तत्काळ ही माहिती एम.एच.२९ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड अँडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळचे उपाध्यक्ष प्रज्वल तुरकाने यांच्यापर्यंत पोहोचवली.
प्रज्वल तुरकाने यांनी वनविभाग यवतमाळला घटनेची माहिती दिली.त्यानंतर वनविभागाचे वाहनचालक अमित शिंदे आणि संस्थेचे प्रज्वल तुरकाने,शुभम तेलगोटे,गट्टू भगत,आणि धनश्री गोरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
गावातील जमाव आधीच मोठ्या संख्येने उपस्थित होता.संस्थेच्या सदस्यांनी लोकांना शांततेने समजावत अजगर साप शेड्यूल-१ मध्ये संरक्षित असल्याची माहिती दिली आणि कोणत्याही सापाला किंवा वन्यजीवाला हानी पोहोचवू नका,असे आवाहन केले.
त्यानंतर,वनविभागाच्या संयुक्त कार्याने त्या अजगराला सुरक्षितपणे पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये त्वरित मदतीसाठी एम.एच.२९ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड अँडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळच्या हेल्पलाईन क्रमांक ९८५०५७७६१६ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.