मेटीखेडा आरोग्य केंद्रात १६ तासात ६ प्रसूती.
यवतमाळ :- येरवी मनुष्य बळ अभावी कीवा आधुनिक तंत्रज्ञान व सोई सुविधा अभावी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात अल्प प्रमाणात प्रसूती होतात केवळ प्राथमिक तपासणी व उपचार करून शहरी भागातील मोठ्या दवाखान्यात संधर्भित केल्या जातात. परंतू कळंब तालुक्या अंतर्गत आदिवासी व दुर्गम भागातील मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात काल एकाच दिवसात ६ प्रसूती सुखरुप करण्यात आल्या. ६ ही बालकांची तब्येत ठणठणीत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही. शासनाकडून मोठ्या प्रमाणात औषधी साठा व इतर सुविधा पुरविल्या जातात परंतू मनुष्यबळ अभावी किंवा अत्यावश्यक सोईसुविधा नसल्याने उपलब्ध आरोग्य कर्मचारी या छोट्या केंद्रावर प्रसूती करण्यास धजावत नाही. मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांचे योग्य मार्गदर्शन व पाठपुराव्याने जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रात प्रसूतीचे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली आहे. व संदर्भीत करण्यास आळा बसला आहे व जिल्हा व उपजिल्हा रूग्णालयावरील ताण कमी होत आहे. मेटीखेडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेंद्र चव्हाण व त्यांचे अधिनस्त कर्मचारी कार्यतत्पर कंत्राटी एलएचव्ही कल्याणी डेरे, आरोग्य सेविका पुष्पा गेडाम, रितेश ठाकरे, अनिल पाटील, आशा सेविका ज्योति पंधरे, इंदिरा टेकाम, संगीता सलाम, सुनिता पवार, एस शिंदे यांच्या एकत्रित प्रयत्नाने ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवेवर विश्वास बसत असून उपचार घेणाऱ्यांची संख्या सुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे. काल झालेल्या प्रसूतीत कळंब तालुक्यातील रेखा बुदरूकशे, संजीवनी कुमरे, सपना देवतळे, रेणुका मराठे, करीना जांभुळकर, वंदना मडावी यांना प्रसूतीपश्चात औषधोपचार करून प्रा.आ.केंद्रातर्फे प्रसव साहित्य सुध्दा देण्यात आले आहेत.
परिसरातील जनतेला मिळत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल संतोष निर्माण झाला असुन मोठ्या प्रमाणात सर्व आरोग्य संस्थेवर अशा प्रकारच्या उत्कृष्ठ सेवा देण्याची अपेक्षा सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद यवतमाळ