तहसील कार्यालयासमोर अप्पर वर्धा धरणग्रस्त उपोषण मंडपात धरणग्रस्ताची गळफास लावून आत्महत्या जिल्ह्यात खळबळ

मोर्शी(तालुका प्रतिनिधी)दि.२७/१
मोर्शी तहसील कार्यालयासमोर गेल्या 254 दिवसापासून अप्पर वर्धा
धरणग्रस्ताचे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे.राज्य शासनाच्या लोकप्रतिनिधीने उपोषणकर्ते च्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने धरणग्रस्तांच्या वतीने दि. 25 जानेवारी रोजी वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता. दिनांक 26 जानेवारी च्या रात्री तहसील कार्यालयासमोर असलेल्या उपोषण मंडपात वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील टाकरखेडा येथील धरणग्रस्त गोपाल बाजीराव दहिवडे व 48 वर्ष या तरुणाने उपोषण मंडपात दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब शनिवारी सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ माजली आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना राज्य शासनाच्या वतीने धरणग्रस्तंच्या मागण्या मंजूर न केल्यामुळे सदर आंदोलन हे तीव्र होणार आहे.पोलिसांच्या वतीने सदर मृतदेह खाली करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.