ग्रा.पं सावरगाव येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माती मेरा देश ‘अमृत कलश यात्रा व स्वछता ही सेवा कार्यक्रम

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माती मेरा देश ‘या उपक्रमात अमृत कलश यात्रा आणि स्वछता ही सेवा घाटंजी तालुक्यातील ग्राम पंचायत सावरगाव (मंगी) गावात गावातील ग्रामस्थ शेतकरी,शाळेतील विद्यार्थी शिक्षक ग्राम पंचायत सदस्य यांच्यासह मोठ्या उत्साहात रॅली काहडण्यात आली. सावरगावात कलश काढण्या पुर्वी वाजत गाजत गावातून यात्रा काढण्यात आली.
केंद्र सरकार स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची अमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून गटविकास अधिकारी महेश ढोले व पंचायत विस्तार अधिकारी ईसलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव ग्राम पंचायतचे सरपंच सौ.सविता मोहूर्ले ग्रामसेविका सुलोचना गजाम,केंद्र प्रमुख रवी आडे, मुख्याध्यापक यशवंत जिवणे यांच्या पुढाकारात स्थानिक जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील तेलंग उपसरपंच सौ कलावती वानखडे ग्रा.प.सदस्य पंकज प्रधान सायरा शेंडे ,मोहन तोरे,शंकर पेद्दींटिवार, महाजन दशरथ मोहूर्ले,प्रकाश पाटील व शाळेती सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ महिला बचत गट इत्यादी मान्यवर मंडळी यांचा सहभाग घेवून ‘मेरी माती मेरा देश ‘हा उपक्रम राबविण्यात आला.गावाचा कलश बनविण्यासाठी चिमुटभर या प्रमाणे मातीचे संकलन करण्यात आले.ज्यांचेकडे माती नाही अश्या कडून चिमुटभर तांदूळ घेवून मातीच्या कलशात जमा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राम पंचायत स्तरावरून एक कलश तयार करण्यात आले असून यातून उरलेल्या मातीचा उपयोग गावस्तरावर अमृत वाटीका करिता करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कलशासाठी लागणारे साहित्य गोळा करताना वाद्ये वाजवून उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यात आले होते.त्यामुळे सर्वामध्ये आनंद संचारला होता. यावेळी शाळेचे शिक्षक सुषमा पडगीलवार,हिवरे सर,ग्राम संगणक चालक विनोद कांबळे, शिपाई दयाकर आनंदीवार, भूमना जिद्दीवार व गावकरी ग्रामस्थ उपस्थित.