हटके

महिला या कारणाने पर पुरुषाकडे होतात आकर्षित

Spread the love
या कारणाने महिला होतात पर पुरुषाकडे आकर्षित
                     अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सुखी संसारात महिलेच्या विवाहबाह्य संबंधामुळे मिठाचा खडा पडतो.आणि मग नवरा बायकोच्या सुखी संसाराला तडा जातो. आपण तिचे चारित्र्य आणि संस्कारावर बोट ठेवत मोकळं होतो. पण आपण कधी असा विचार केला आहे काय ? की महिला पर पुरुषाषकडे का आकर्षित होतात. कारण प्रत्येक स्त्रीला आपला संसार नीट चालावा. आपल्या मुलांना वडिलांचे (पती) सुख मिळावे असे तिला वाटते.  कोणतीही स्त्री मुद्दाम आपले घर मोडू इच्छित नाही. मग ती घराच्या उंबरठ्याबाहेर प्रेम का शोधते? याचे उत्तर तिच्या ‘कॅरेक्टर’मध्ये नसून, तिच्या ‘नात्यातील भावनिक पोकळीत’ दडलेले असते.
लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस छान जातात, पण जसजशी वर्षे सरतात, तसा पती-पत्नीमधील संवाद कमी होऊ लागतो. नवऱ्याचे पूर्ण लक्ष करिअर, पैसा आणि जबाबदाऱ्यांवर केंद्रित होते. तो पत्नीशी बोलतो, पण ते फक्त कामापुरतेच. “जेवण झाले का?”, “मुले काय करत आहेत?”, “लाईटबिल भरले का?” – या पलीकडे गप्पा होत नाहीत. अशा वेळी स्त्रीला एकाकीपण जाणवू लागते. तिला अशा व्यक्तीची गरज असते जी तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेईल. जर परपुरुषाने तिला ती ‘अटेन्शन’ दिली, तिचे म्हणणे मनापासून ऐकले, तर ती नकळत त्याच्याकडे ओढली जाते. कारण तिथे तिला तिचे ‘मन मोकळे’ करता येते.
प्रत्येक मानवाला, मग तो स्त्री असो वा पुरुष, कौतुकाची भूक असते. लग्नाआधी जो प्रियकर आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचे, तिच्या स्वयंपाकाचे किंवा तिच्या साडीचे भरभरून कौतुक करायचा, तोच लग्नानंतर या गोष्टी गृहीत धरू लागतो. दिवसभर राबून, स्वतःला छान ठेवूनही जर पतीने तिच्याकडे साधे बघून हसले नाही किंवा “आज तू छान दिसतेयस” असे म्हटले नाही, तर ती कोमेजून जाते. अशा वेळी जर बाहेरील एखाद्या व्यक्तीने तिच्या कामाचे किंवा दिसण्याचे कौतुक केले, तर तिला स्वतःचे ‘अस्तित्व’ जाणवू लागते. तिला वाटते की, “मी अजूनही सुंदर आहे, कोणाला तरी माझी दखल घ्यावीशी वाटते.” हे आकर्षण प्रेमापेक्षाही स्वतःच्या ‘व्हॅलिडेशन’साठी (Validation) जास्त असते.
भारतीय समाजात, लग्नानंतर स्त्रीला घराची ‘मालकीन’ कमी आणि ‘केअर टेकर’ जास्त समजले जाते. तिने वेळेवर स्वयंपाक करणे, सासू-सासऱ्यांची सेवा करणे, मुलांचा सांभाळ करणे हे तिचे कर्तव्यच आहे, असे मानले जाते. या सगळ्यात तिची ‘स्त्री’ म्हणून असणारी ओळख पुसली जाते. ती फक्त कोणाची तरी आई, कोणाची तरी पत्नी किंवा सून उरते. जेव्हा एखादा परपुरुष तिला या जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन एक ‘व्यक्ती’ म्हणून महत्त्व देतो, तेव्हा तिला तो आधार वाटू लागतो. जिथे तिला ‘फॉर ग्रांटेड’ घेतले जात नाही, तिथे तिचे मन रमू लागते.
संसाराचे गाडे ओढताना नवरा-बायकोमधील ‘मैत्री’ हरवते. सततच्या कटकटी, जबाबदाऱ्या आणि तडजोडी यामुळे नात्यात रुक्षपणा येतो. स्त्रीला अशा मित्राची गरज असते ज्याच्याशी ती विनासंकोच हसू शकेल, चेष्टा-मस्करी करू शकेल. अनेकदा पती ‘ब बॉस’ किंवा ‘उपदेशका’च्या भूमिकेत असतो. पण परपुरुष जेव्हा मित्र बनून येतो, तेव्हा तो तिच्या चुका काढत नाही तर तिला समजून घेतो. हे निखळ मैत्रीचे नाते तिला हवेहवेसे वाटते आणि या मैत्रीचे रूपांतर कधी आकर्षणात होते, हे तिचे तिलाच कळत नाही.
केवळ शारीरिक ओढ हे परपुरुषाकडे आकर्षित होण्याचे कारण नसते. स्त्रियांसाठी भावनिक गुंतवणूक  ही शारीरिक सुखापेक्षा जास्त महत्त्वाची असते. जेव्हा पती तिच्या भावनांना किंमत देत नाही, तिच्या रडण्याला ‘नाटक’ समजतो किंवा तिच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ती भावनिक आधारासाठी बाहेर बघते. परपुरुषाने दिलेला छोटासा भावनिक आधारही तिला डोंगराएवढा वाटतो. कारण तो तिच्या दुःखावर फुंकर घालतो, जे काम खरे तर तिच्या पतीने करायला हवे असते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close