शासनाच्या अडेलतट्टू धोरणाने. मेळघाटातील मजूर कामापासून वंचित
गटविकास अधिकाऱ्यांचा मनरेगा कामावर बहिष्कार
मेळघाटातील मजुरांवर उपासमारीची पाळी
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
-संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण रोजगार हमी योजनेची कामे ही ग्रामसेवकाचे व रोजगरसेवकाचे अधीन राहून केले जातात त्या सर्व कामांवर ग्रामसेवकांचे पूर्णपणे लक्ष राहते, परंतु अलीकडेच ग्रामसेवकांनी त्या कामांवर देखभाल व देयकांवर बहिष्कार टाकला ते शासनाने मान्य करून ती जबाबदारी गटविकास अधिकारी यांचे कडे दिली, परंतु प्रत्यक्षात गटविकास अधिकारी यांना तालुक्यातील प्रभार असल्याने ते ग्रामीण भागातील कामांवर लक्ष ठेऊ शकत नाहीत परिणामी देयकात चूक झाल्यास गटविकास अधिकारी जबाबदार राहतील त्यामुळे सदर कामावर केवळ ग्रामसेवक, रोजगार सेवकच लक्ष ठेऊ शकतो ह्या कारणास्तव तालुक्या गटविकास अधिकारी संघटनेचा मनरेगा कामावर बहिष्कार असल्याने सर्व प्रकारचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे कामावर बहिष्कार करण्यात आल्याने मेळघाटमधिल हजारो मजुर कामापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मजूर वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मेळघाटामधील बहुसंख्य मजुर हे रोजगार हमी योजनेच्या कामावर अवलंबून असून याच कामाच्या भरवश्यावर यांचा उदरनिर्वाह चालतो.शासनाच्या विविध धोरणे व नवनवीन तंत्रज्ञान यामुळे कधी कंत्राटी कर्मचारी तर कधी राजपत्रित अधिकारी त्यांच्या मागण्याना घेऊन कामबंद आंदोलन करतात.त्यामुळे त्याचा भुर्दंड कामाच्या भरवश्यावर आपला जीवन व्यतीत करणाऱ्या मजुरांना सोसावा लागतो.भर उन्हाळ्यात मेळघाट मध्ये मोठया प्रमाणात कामे सुरू असतात त्या भरवशावर ह्या मजुरांच्या हाताला कामे मिळतात. त्यामुळे मजुर वर्ग समाधानी असतो परंतु गटविकास अधिकारी यांनी म. गा. रा.रोजगार हमी योजनेचे सर्व कामे बंद केल्याने पुन्हा मजुरावर उपासमारीची पाळी येत आहे. मजुर वर्ग कोणाकडे सदर कैफियत घेऊन जाणार.
अधिकारी वर्ग त्यांच्या एखाद्या अधिकाऱ्यावर कार्यवाही झाल्यास त्वरीत शासनाच्या आडमुठे धोरण म्हणून धिक्कार करतात व व नरेगाच्या कामावर बहिष्कार टाकतात,काम बंद करून त्याचा परिणाम मजुरांना सोसावा लागतो. ह्यावरून मजुरांचा कैवारी कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे
**********************
*चुरणी क्षेत्रातील हजारों आदिवासींची उपासमारी*
चिखलदरा पंचायतसमिती अंतर्गत येणाऱ्या चुरणी क्षेत्रातील ग्रामपंचायत येथील बहुतांश आदिवासी रहिवाशी मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या कामावर जाऊन आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करायचे ,मात्र १२ एप्रिलपासून गटविकास अधिकारी यांच्या आदेशान्वये मग्रारोहयोची कामे बंद करण्यात आल्याने क्षेत्रातील जवळपास तीस हजार आदिवासी मजुरांना काम नसल्याने ते बेरोजगार झाले आहे. मग्रारोहयोची कामे तत्काळ सुरू करावी, अशी व्यथा क्षेत्रातील ग्रामस्थानी व मजूर वर्गाने आमच्या प्रतिनिधि जवळ व्यक्त केले
.जिल्हयातील गटविकास अधिकारी मग्रारोहयो कामाच्या अनुषंगाने संपावर आहेत.गेल्या फरवरी पासून काम बंद होते.आता आठवड़ा भरापासून मग्रारोहयोची कामाला सुरवात झाली आणी मात्र पहिला आठवड़ा हि पूर्ण झाला नाही आणी या कामाला गटविकास अधिकारी यांचा संपाचा ग्रहण लागला आहे . परिणामी दररोज काम करणारे तालुक्यातील तीस ते चालीस हजार मजूर एकाएकी कामापासून वंचित झाले आहे.
दररोज कामाला जाऊन कुटूंबाचा गाडा चालविल्या जात असे, मात्र आता हे सर्व मजूर घरी बसले आहेत. तरी शासनाने तत्काळ योग्य तो निर्णय घेत त्या मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चुरणी क्षेत्रातील मजूरवर्ग यांनी केली आहे..
संपूर्ण महाराष्ट्रात मनरेगा मार्फत होणाऱ्या कामाची देखभाल, व त्यांचे देयक काढण्याचे पूर्व प्रमाणित अधिकार हे ग्रामसेवक, रोजगारसेवक ह्यांना होते, आणि ग्रामसेवस्क व मजूर असा यांचा थेट संपर्क सुद्धा येतो त्या कामांशी आमचा कोणताही सबध येत नाही परंतु ग्रामसेवकांनी सदर कामावर बहिष्कार टाकला, ही चुकीची बाब आहे असे गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांनी सांगितले