सामाजिक

वैद्यकीय महाविद्यालय हे वर्धा येथेच उभारावे – वीर अशोक सम्राट संघटना

Spread the love
वर्धा / प्रतिनिधी
        शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वर्धा येथेच उभारावे यासाठी वीर सम्राट संघटनेकडुन शासन आणि प्रशासन दरबारी निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की वर्धा शहर मध्ये दोन वैद्यकीय महाविद्यालये ग्रामीण क्षेत्र  भागातील सावंगी मेघे व सेवाग्राम येथे आहेत, परंतु एकही महाविद्यालय हे शासकीय नाही आहे , तसेच सन १९१५ पासून जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा २८६ खाटाचे कार्यरत येथे आहे सन २०२२ मध्ये ५० बेड़चे आय.सी.यु. चे काम करण्यांत आले व सुरू करण्यात आले , तसेच जुने सामान्य रुग्णालय, वर्धा येथे २८६  व नविन ५० बेड वाढविले,  व यानंतर सन २०२१ ला १०० खाटाचे नविन महिला रुग्णालय बनविण्यांत आले यावर मोठा खर्च होवुनही आतापर्यत वर्धा येथे  महिला रुग्णालय सुरु करण्यांत आले नाही , व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग च्या नियम अनुसार वर्धा जिल्हातला मेंन शासकीय सामान्य रुग्णालय वर्धा हा रुग्णालय ४०० खाटाचे वरत आहे व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग च्या नियम अनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथेच बनला पाहिजे वर्धा जिल्ह्याचे चे वर्धा शहर हे मुख्य स्थान आहे इथे रेल्वेची सुविधा संपूर्ण भारतामध्ये कुठेही येण्या जाण्यासाठी आहे तसेच बस ची सुविधा व जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा शहरामध्येच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूर शहराचे रहवासी आहे यांना संपूर्ण सगळी काही माहिती असुन ही तरिही नागपूर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री यानी चूकीचा निर्णय घेतला आहे. व हिंगणघाट तालुक्यातील शासकीय रुग्णालय १०० खाटेच्या कमी असुनही तिथे  वैद्यकीय महाविद्यालय कां स्थानांतरीत करण्यांत आले, व हिंगणघाट तालुक्यात नवीन ४०० खाटाचे रुग्णालय बनविण्यासाठी १५१ कोटी रुपयाची निधी का मंजूर करण्यात आली आम्ही संपूर्ण वर्धा जिल्ह्यातली जनता महाराष्ट्र राज्य सरकारला नम्र विनंती करतो की १५१ कोटी रुपयांची निधी तुरंत रद्द करण्यात यावा व आम्ही उपमुख्यमंत्री फडवणीस याच्या जाहीर निषेध करतो की जे संविधानिक आमच्या आरोग्याच्या हक्क आहे जे आम्हाला मिळणार होता ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असविधानिक निर्णय घेऊन वर्धा जिल्ह्यातली संपूर्ण १६ ते १७ लाख जनतेच्या आरोग्याच्या हक्क  हिसकावून घेतला आहे म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो, आम्ही वर्धा जिल्ह्यातली १६ ते १७ लाख जनता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग विभागाला व केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारला नम्र विनंती करतो की तुमच्या नियमानुसार वर्धा शहरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय ४०० खाटाचे आहे इथे जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागून जुनी जिल्हा परिषद ची जागा व त्याच्या मागचे भागे ची जागा ही बस स्टॅन्ड ला लागून महात्मा गांधी विद्यालय पर्यंत ४० ते ५० एकड इतकी मोठी जागा आहे .व तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय इथून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर साटोडा  येथे जे जागा शासन व प्रशासनांनी बघितली होती व त्याचे प्रस्ताव २१,०२,२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व मंत्रालय मुंबई मध्ये पाठविण्यात आले होते, ही पण जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनविण्यासाठी योग्य आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग विभाग नई दिल्ली व केंद्र सरकार  व महाराष्ट्र राज्य सरकारला आम्ही वर्धा जिल्ह्यातली संपूर्ण जनता नम्र विनंती करतो की योग्य निर्णय घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरामध्येच बनविण्याच्या निर्णय घ्यावा व जनतेचे जे संविधानिक हक्क आहे जे भारतीय संविधान अनुसार भारतातले सगळे नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे भारत सरकारची स्वतःची जबाबदारी व कर्तव्य आहे  वर्धा जिल्ह्यातली १७ लाख जनतेला चांगली संपूर्ण आरोग्य सुविधा द्यावी अशी निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close