मागणी
रावेत परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी सुसज्य गार्डन करावे -मयुर पवार
रावेत / प्रतिनिधी
रावेत परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन करावे युवासेना शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपशहरप्रमुख मयुर पवार यांची आयुक्त साहेब यांना निवेदनातून मागणी. मयुर पवार यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की रावेत परिसरात राहणारे लोकांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे व बरेच नवीन प्रोजेक्ट या भागात विकसित होत आहेत. अनेक बिल्डिंग अश्या आहेत ज्यामध्ये लहान खेळण्यासाठी गार्डन नाही. त्यामुळे मुले रोड खेळताना व ज्येष्ठ नागरिक सकाळी शतपावली करताना दिसतात. त्यामुळे रावेत भागात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी , लॉन असेल व जॉगिंग ट्रॅक असेल असे सुसज्य गार्डन करावे अशी मागणी मयुर पवार यांनी केली..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1