क्राइम

मौलवी कडून शिक्षिकेवर अत्याचार  ; आरोपीला अटक 

Spread the love
मेरठ / नवप्रहार मीडिया

                पतीवर उपचाराच्या बहाण्याने शिक्षिकेवर बलात्कार करून त्या घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून लक्षावधी रुपये उकळणाऱ्या मौलवी ला महिलेच्या तक्रारी वरून अटक करण्यात आली आहे. हाफिज शाहिद असे आरोपीचे नाव आहे.  व्हीडिओ दाखवून हाफिज शाहिद महिला शिक्षिकेला ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळत होता.

ही घटना मेरठमधील इंचोली पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथील एका सरकारी शाळेतील ५६ वर्षीय शिक्षिकेने मौलाना हाफिज शाहिदविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले आहे की, १० वर्षांपूर्वी पीडित मुलगी मदरशात शिक्षिका म्हणून मुलांना शिकवायची. यादरम्यान तिची तेथे शिकवणाऱ्या मौलाना हाफिज शाहिद यांच्याशी ओळख झाली.महिलेच्या पतीची तब्येत अनेकदा खराब असायची. त्यामुळे तिने मौलाना हाफिज शाहिदचा सल्ला घेतला. हाफिज शाहिदने महिला शिक्षिकेच्या पतीवर भूतबाधा झाल्याचे सांगितले. 

 

काही वेळाने मौलाना महिलेच्या घरी जाऊ लागला आणि भूत काढण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने गुपचूप एक व्हिडिओही बनवला. नंतर तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपींने पीडितेकडून सुमारे सात लाख रुपये उकळले. आरोपी शिक्षिकेकडून एक कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही केला जात आहे.

तक्रारीत पीडितेने पुढे म्हटले आहे की, २३ ऑगस्ट रोजी हाफिज शाहिदने पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने पीडितेला बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. अखेर महिला शिक्षिकेने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मौलाना हाफिज शाहिदविरुद्ध आयपीसीच्या कलम ३२३, ३२८, ३७६ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला. अखेर  मौलानाला अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close