क्राइम

मौलाना कडुन अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण 

Spread the love

गर्भवती झाल्यावर दिले गर्भपाताचे औषध 

प्रकृती बिघडल्याने मुलीला केले भरती 

कानपुर / नवप्रहार डेस्क 

                  अल्पवयीन मुलीला खाण्या पिण्याच्या वस्तू देऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि ती गर्भवती झाल्यावर तिला गर्भपाताचे औषध देणाऱ्या व तिची प्रकृती बिघडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मौलाविला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूरच्या नौबस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे एक गरीब कुटुंब मजुरी करून आपला प्रपंच चालवत होते. तेथेच घरासमोर राहणारा सोनू हाफिज हा याच भागातील एका मशिदीत मौलाना आहे. तोबऱ्याच दिवसांपासून संबंधित 14 वर्षिय पीडितेला खाण्या-पिण्याच्या वस्तू देण्याचे आमिश दाखवून घरी बोलवायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. विरोध केला असता, त्याने संपूर्ण कुटुंबालाच जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप आहे.

दरमन्या पीडित मुलगी गर्भवती झाली, यामुळे तिची प्रकृती बिघडली. यातच आरोपी सोनूने तिला गर्भपाताची औषधे दिल्याचाही आरोप आहे. यामुळे तिची प्रकृती बघडली. पीडितेच्या आईने म्हटले आहे की, ईदच्या दिवशी प्रकृती बिघडल्याने मुलगी भयभीत अवस्थेत दिसत होती. विचारले असता तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.

मुलीची प्रकृती खालावल्यानंतर कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी नौबस्ता पोलिसांना तक्रार दिली. यासंदर्भात कानपूर डीसीपी रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरोधात बलात्कार, पॉक्सो अॅक्ट आणि जीवे मारण्याची धमकी, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close